आंतरराष्ट्रीय वाहन परवाना मिळणार आता ऑनलाइन 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 एप्रिल 2018

पुणे - परदेशात वाहन चालविण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) आता नागरिकांना ऑनलाइनही उपलब्ध होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे. 

पुणे - परदेशात वाहन चालविण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) आता नागरिकांना ऑनलाइनही उपलब्ध होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) जाहीर केले आहे. 

"आयडीपी' हवा असेल, तर नागरिकांनी parivahan.gov.in या संकेतस्थळावर सारथी सर्व्हिसेस पर्याय निवडून अर्ज भरावा. प्रिंट काढून घ्यावी. आवश्‍यक कागदपत्रे (उदा : वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट, व्हिसा, ड्रायव्हिंग लायसन, फोटो आदी) अपलोड करावीत. "आयडीपी'साठीचे 1000 रुपयांचे शुल्क ऑनलाइन भरावे. त्यानंतर मूळ कागदपत्रांसह अर्जदाराने स्वतः प्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहावे. त्याला त्याचदिवशी सायंकाळपर्यंत "आयडीपी' मिळू शकेल, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले. काही दिवस ऑफलाइन पद्धतीनेही "आयडीपी' मिळणार आहे. 

अर्जदाराच्या पासपोर्टवरील पत्ता आणि ड्रायव्हिंग लायसनवरील पत्ता एकच आणि पुण्याच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील असणे आवश्‍यक आहे. 2016-17 मध्ये पुणे आरटीओमार्फत 3 हजार 444 तर, 2017-18 या वर्षी 2921 "आयडीपी' नागरिकांनी घेतले आहेत. 

Web Title: International vehicle license will now get online