इस्राईलमधील विद्यापीठांच्या प्रतिनिधींशी चर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 नोव्हेंबर 2016

पुणे - सकाळ माध्यम समूह 15 नोव्हेंबरला इस्राईलमधील विद्यापीठे आणि महाविद्यालयांच्या प्रतिनिधींसोबत "सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर'मध्ये गोलमेज परिषद घेणार आहे. इस्राईलमधील "कौन्सिल फॉर हायर एज्युकेशन'च्या नेतृत्वाखालील हे प्रतिनिधी 15 आणि 16 नोव्हेंबरला पुणे कार्यालयाला भेट देणार आहेत. नवी दिल्ली येथे 10 आणि 12 नोव्हेंबरला होणाऱ्या "फिक्की हायर एज्युकेशन समिट'मध्ये सहभागी होण्यासाठी हे प्रतिनिधी भारतात आले आहेत. इस्राईलच्या वाणिज्यदूतांच्या विनंतीवरून "सकाळ' माध्यम समूहाने ही चर्चा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

कुशल मनुष्यबळ असणाऱ्या अव्वल देशांपैकी इस्राईल हा एक देश आहे. "जीडीपी'ची टक्केवारी आणि संशोधन व विकास क्षेत्रात सर्वाधिक खर्च करणारा हा देश आहे. जगातील अव्वल 100 विद्यापीठांत या देशातील तीन विद्यापीठांचा समावेश आहे. "स्टार्ट अप नेशन' म्हणून इस्राईलची जगभर ओळख असून, सर्वाधिक स्टार्ट अप कंपन्या असणारा हा देश आहे. यातील बहुतांश कंपन्यांची नोंदणीही इस्राईलमधील विद्यापीठांच्या कॅम्पसमध्ये झाली आहे. 

उच्च शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात भारताबरोबर सहकार्यासाठी इस्राईलला मोठ्या संधी खुणावत आहेत. भारतीय आणि चिनी विद्यार्थ्यांना 100हून अधिक पोस्ट-डॉक्‍टरल स्कॉलरशिप मिळतील. इंग्रजीत विविध अभ्यासक्रम शिकवणाऱ्या इस्रायली विद्यापीठांची संख्या वाढत आहे. अधिकाधिक भारतीय विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी ही विद्यापीठे इच्छुक आहेत. या वर्षी तेल अविव विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाच्या सहकार्याने मराठीत अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

शिष्टमंडळ भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांशी अधिकाधिक सहकार्य करण्याच्या प्रयत्नात आहे. सप्टेंबर 2016मध्ये इस्राईलमध्ये "एज्युकॉन कॉन्फरन्स' यशस्वी करणारा "सकाळ' समूह 15 नोव्हेंबर 2016 रोजी इस्रायली विद्यापीठांबरोबर पुण्यातील विद्यार्थी, महाविद्यालये आणि विद्यापीठांची चर्चा घडवून आणणार आहे. 17 नोव्हेंबरला हेर्झलियातील इंटर डिस्सिप्लिनरी सेंटर (आयडीसी) या संस्थेचे भारतीय आणि इस्रायली अध्यक्ष समझोता करार करतील. इस्रायली प्रतिनिधी पुणे विद्यापीठाबरोबरच येथील नामांकित महाविद्यालये आणि इतर विद्यापीठांना भेट देणार आहे. 

सहभागाची संधी 

"सकाळ माध्यम समूहा'कडून घेतल्या जाणाऱ्या या गोलमेज चर्चेत आपणही नोंदणी करून सहभागी होऊ शकाल. 8605699007, 8888839082, 7722011329 या एसआयएलसी कॉलसेंटर क्रमांकावर शैक्षणिक संस्था नोंदणी करू शकतात. यासाठी दोन हजार रुपये शुल्क असेल. संस्था, महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या वतीने एका व्यक्तीला सहभागी होता येईल. यासाठी 30 जागा आहेत. सहभागाची संधी मिळणाऱ्यांना इस्रायली शिष्टमंडळातील प्रतिनिधींशी संवाद साधता येईल.

Web Title: Israila university representatives to discussion