आयटीआयनंतर आता दहावी, बारावीत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

पुणे - औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) व्यवसाय विषय उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीची समकक्षता मिळणार आहे. दहावीची समकक्षता मिळालेला विद्यार्थी अकरावीच्या कोणत्याही शाखेत प्रवेश घेऊ शकेल.

राज्य सरकारने या संबंधीचा आदेश जारी केला आहे. किमान कौशल्य (एमसीव्हीसी) विषय घेऊन बारावी पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षणातील ज्या अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो, त्या सर्व अभ्यासक्रमांना आयटीआयचा विद्यार्थी प्रवेश घेऊ शकेल.

आयटीआयमधील इच्छुक उमेदवारांना राज्य मंडळाच्या दहावी वा बारावी परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या कमाल गुणांचे रुपांतर राज्य मंडळाच्या परीक्षेसाठी ४०० गुणांमध्ये करता येईल. त्यासाठी विषयांची निवड करता येईल. या विद्यार्थ्यांना दहावीच्या ‘सर्वोत्तम पाच’ (बेस्ट ऑफ फाइव्ह) योजनेचा लाभ मिळू शकेल.

 विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय खूप फायद्याचा आहे. त्याला उच्च शिक्षण घेण्यासाठी वा करियरची दिशा बदलण्यासाठी तो उपयुक्त ठरू शकतो.
- अनिल जाधव, संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभाग

Web Title: ITI SSC HSC admission