साडेसहा हजार गावांमध्ये 'नाबार्ड'तर्फे जल अभियान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 मार्च 2017

पुणे - 'नाबार्ड'च्या वतीने जल अभियान राबविण्यास सुरवात झाली आहे. राज्यातील साडेसहा हजार गावांमध्ये ही मोहीम राबविली जाईल. पाण्याची उपलब्धता कमी असलेल्या; तसेच भूजलाचा मोठ्या प्रमाणात उपसा झालेल्या गावांमध्ये प्राधान्याने ही मोहीम राबविली जात आहे.

"नाबार्ड'तर्फे गेल्या वर्षीही याच पद्धतीची देशपातळीवर मोहीम राबविली होती. "नाबार्ड'ने महाराष्ट्रात 314 ठिकाणी पाणलोट विकासाचा कार्यक्रम राबविला असून, त्याचा फायदा सहाशेंपेक्षा अधिक गावांतील तीन लाख कुटुंबांना झाला. या मोहिमेअंतर्गत ग्रामीण भागात जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, शेतीला ठिबक सिंचन व अन्य पद्धतीने पाणी देण्याला प्रोत्साहन दिले जाईल. ग्रामीण भागातील काही स्वयंसेवक जलदूत म्हणून निवडले जाणार असल्याचे "नाबार्ड'च्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: jal abhiyan by nabard