शालेय विद्यार्थ्याचा विहिरीत पडून मृत्यू

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

जुन्नर - जुन्नर जवळील बारव येथील घटना. इयत्ता दहावीचा सहामाहीचा पेपर संपल्यानंतर घराजवळील  असलेल्या विहिरीवर पोहण्यास गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवार दि ६ रोजी सायंकाळी चारच्या सुमारास बारव ता.जुन्नर येथे घडली. ओमकार बाळू कारभळ वय वर्षे १६ हे या घटनेत मृत झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्नर शहरालगत असलेल्या बारव वस्तीमध्ये बारा बावडी ही जुनी विहीर आहे. ओमकार बाळू कारभळ हा विद्यार्थी दुपारी तीन च्या सुमारास शाळेचा पेपर सुटल्यानंतर या विहिरीवर पोहण्यास गेला. पोहण्यासाठी सूर मारल्यावर  तोंडाला फटका बसल्याने ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात या. मुलगा घरी लवकर आला नाही म्हणून घरच्या व्यक्तींनी शोधाशोध सुरू केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ओमकार याचा मृतदेह सातच्या सुमारास बाहेर काढण्यात आला. मृतदेह बाहेर काढण्यासाठी गणेश केदारी, गजराज बायस, गोट्या परदेशी, बाळू बोऱ्हाडे, हेलम यांनी शर्थीचे प्रयत्न केले. ओमकार हा जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. जुन्नर व बारव परिसरात ओमकार याचा मोठा मित्र परिवार असल्याने या घटनेने हळहळ व्यक्त होत . ओमकार याचे आई वडील आरोग्य खात्यातील कर्मचारी आहेत. तर पाडळी ग्रामपंचायत सदस्य राजेश कारभळ यांचा तो पुतण्या होता.