अल्पवयीन मोबाईल चोर जेरबंद

चोरट्याकडून सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचे तब्बल चाळीस महागडे मोबाईल जप्त करण्यात आले
एमआयडीसी परिसरातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद करून त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस पथकाने तब्बल चाळीस चोरीचे महागडे मोबाईल जप्त केले.
एमआयडीसी परिसरातील कामगारांचे मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद करून त्याच्याकडून एमआयडीसी पोलिस पथकाने तब्बल चाळीस चोरीचे महागडे मोबाईल जप्त केले.Sakal

शिरूर - रांजणगाव एमआयडीसीतील कामगारांच्या खोल्यांतून त्यांचे मोबाईल चोरून अत्यंत कमी किमतीत परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या अल्पवयीन अट्टल चोरट्यास एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. अवघ्या साडेसतरा वर्षे वयाच्या या चोरट्याकडून सुमारे साडेचार लाख रूपये किंमतीचे तब्बल चाळीस महागडे मोबाईल जप्त करण्यात आले.

श्रीगोंदा तालुक्यातील एका छोट्याशा गावातील हा अल्पवयीन चोरटा गेल्या वर्षभरापासून पिंपरी - चिंचवड परिसरात वास्तव्यास होता व चोरलेले मोबाईल विकून ऐषारामी जीवन जगत होता. काल रात्री त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचे चाळीस मोबाईल जप्त केले असल्याची माहिती रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

आज या चोरट्याची बालसुधारगृहात रवाणगी करण्यात आली. रांजणगाव एमआयडीसी परिसरात कामगारांची दाट लोकवस्ती असून, ते परिसरातील रांजणगाव गणपती, कारेगाव व ढोकसांगवी या गावांतून भाड्याच्या खोल्यांतून राहतात. एकेका खोलीत पाच ते दहाजण एकत्र राहात असून, एका शिफ्ट चे कामगार आले की दुसऱ्या शिफ्टचे कामाला जात असल्याने बरेचदा खोल्यांचे दरवाजे उघडेच असतात. याचाच गैरफायदा घेत या अल्पवयीन चोरट्याने अशा उघड्या घरांतून, घरांच्या खिडकीतून हात घालून, खिडकीत चार्जींगला लावलेले किंवा कामगारांच्या खोल्यांतून खुंटीला अडकवलेल्या पॅंटच्या खिशातून हे मोबाईल चोरले होते, अशी माहिती त्यांनी दिली.

सामान्य कामगारांचे मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली. सहायक फौजदार दत्तात्रेय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ व पोलिस कॉन्स्टेबल विजय शिंदे या पथकाने गेले महिनाभर कामगारांच्या चाळीत येणा-या - जाणाऱ्या अनोळखी लोकांवर पाळत ठेवली. त्यातून अल्पवयीन चोरट्याच्या संशयित हालचालींचा संशय आल्यावर परिसरातील सीसीटीव्ही चित्रणात कामगारांच्या खोल्यांतून, खिडकीतून तो मोबाईल चोरून नेत असल्याचे समोर आल्यावर पथकाने त्याच्या हालचालींवर लक्ष्य केंद्रीत केले. मात्र, पोलिस आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा संशय आल्याने चोरट्यानेही काही दिवस एमआयडीसी कडे पाठ फिरवली. मात्र काही दिवसांपूर्वीच तो परत चोरी करण्यासाठी आला असल्याचे समजताच पोलिस पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून चाळीस महागडे मोबाईल जप्त केले.

कामगारांनी आपले मोबाईल, महागड्या वस्तूंची सुरक्षितता बाळगावी. शक्यतो घरात असताना किंवा बाहेर जाताना दरवाजे बंद करावेत. दरवाजाजवळ मोबाईल चार्जींगला लावू नयेत. किंवा मोबाईल चार्जींगला लावताना ते ठेवण्यासाठी एखादी कुलूपबंद पत्र्याची पेटी भिंतीला ठोकावी.

- बलवंत मांडगे, पोलिस निरीक्षक, रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com