नाणे मावळामध्ये भातखाचरे भरली

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कामशेत - कामशेतसह नाणे मावळात शनिवारपासून (ता. २४) जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

कामशेत - कामशेतसह नाणे मावळात शनिवारपासून (ता. २४) जोरदार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणीच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे भात खाचरे तुडुंब भरली असून, शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरवात झाली आहे. कामशेत, करंजगाव, गोवित्री, थोरण, जांबवली, सौमवडी, खांडशी नेसावे सांगीसे, वडिवळे व अन्य गावात जोरदार पाऊस सुरू आहे. काही भागात भातखाचरे पाण्याने भरून गेली आहेत. नाणे येथील शेतकरी रामभाऊ नामदेव आंद्रे म्हणाले, ‘‘पावसाअभावी काही भाताच्या दाढी पिवळ्या पडल्या होत्या, तर काही भागात जळाल्या होत्या. या पावसामुळे भातांच्या दाढीला मोठा दिलासा मिळाला आहे.’’ वडिवळे धरण परिसरात २४ तासांत १२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आतापर्यंत २३४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली आहे.