‘के दिल अभी भरा नहीं’चा प्रयोग

‘के दिल अभी भरा नहीं’चा प्रयोग

पुणे - ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’तर्फे सभासदांसाठी ‘के दिल अभी भरा नहीं’ या नाटकाचे दोन विनामूल्य प्रयोग शुक्रवारी (ता. २३) आयोजित केले आहेत. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे पहिला प्रयोग सकाळी ११.३० वाजता व दुसरा प्रयोग दुपारी ३ वाजता होणार आहे.

‘वेध प्रॉडक्‍शन्स’तर्फे हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं. नवीन जोडी म्हणून लीना भागवत व मंगेश कदम यांची निवड केली आहे. मंगेश कदम, लीना भागवत, बागेश्री जोशीराव, चंद्रशेखर कुलकर्णी, लेखक शेखर ढवळीकर, दिग्दर्शक मंगेश कदम, नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत साई-पीयूष, निर्माता गोपाळ अलगेरी आदी कलाकारांचा नाटकात सहभाग आहे.

लोटस खाकरा, शबरी खाकरा हे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. मार्व्हल टुरिझम लकी ड्रॉ प्रायोजक असून त्यांच्यातर्फे लकी ड्रॉ विजेत्याला नवीन वर्षांतल्या ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’चे सभासदत्व त्या व्यक्तीसाठी विनामूल्य असेल.

‘के दिल अभी भरा नही’ वेध प्रॉडक्‍शन्स तर्फे पुन्हा रंगभूमीवर आले. नाटक पाहून मी भारावून गेलो. लीना भागवत व मंगेश कदम यांनी माझी व रिमाची नक्कल न करता स्वतंत्रपणे यातल्या भूमिका साकारल्या. मी हे नाटक पाहून मनमुराद हसलो आणि ढसाढसा रडलोही.
- विक्रम गोखले, अभिनेते

कार्यक्रमांसंबंधी सूचना  
सभासदांसाठी व कुटुंबीयातील एका व्यक्तीला प्रवेश विनामूल्य फोनवर ९०७५०१११४२  प्रवेश नोंदणी सकाळी ११ पासून अथवा ७७२१९८४४४२ यावर व्हॉट्‌सॲप करून नावनोंदणी करू शकता.  नोंदणीच्या वेळी नाटकाच्या प्रयोगाची वेळ सांगून नोंदणी करणे आवश्‍यक, तसेच दिलेल्या वेळेच्या प्रयोगाला उपस्थित राहणे बंधनकारक राहील.  कार्यक्रमाच्या १५ मि. आधी प्रवेश दिला जाईल.  सभासदांनी कार्यक्रमासाठी ओळखपत्र व माहिती पुस्तिकेतील चौथ्या क्रमांकाची प्रवेशिका व सभासद कार्ड आणणे आवश्‍यक.  काही जागा राखीव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com