केरोसिनचे वितरणही आता पॉस मशिनद्वारे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

पुणे - रेशनिंगच्या दुकानातून लाभार्थ्यांना पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरण करण्यात येते. त्याचप्रमाणे आता केरोसिनच्या वितरणासाठी एक जूनपासून पॉस मशिनचा वापर करणार आहे. त्यामुळे केरोसिनच्या काळ्या बाजारास आळा बसणार आहे. 

पुणे - रेशनिंगच्या दुकानातून लाभार्थ्यांना पॉस मशिनद्वारे अन्नधान्य वितरण करण्यात येते. त्याचप्रमाणे आता केरोसिनच्या वितरणासाठी एक जूनपासून पॉस मशिनचा वापर करणार आहे. त्यामुळे केरोसिनच्या काळ्या बाजारास आळा बसणार आहे. 

सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता येण्यासाठी रास्त भाव दुकानांमधून लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केले जाते. लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटविण्यासाठी पॉस (पॉइंट ऑफ सेल डिव्हाईस) मशिनचा वापर केला जात आहे. याच धर्तीवर केरोसिन वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी पॉस मशिनचा वापर करणार आहे. पुणे, मुंबई आणि ठाणे शिधावाटप क्षेत्रातील रास्त भाव दुकानांमध्ये यापूर्वीच पॉस मशिन बसविले आहेत. त्यामध्ये आता केरोसिनची विक्री सुविधा उपलब्ध करून दिली आहे. 

पुण्यासह हवेली तालुका पूर्णपणे केरोसिनमुक्‍त आहे. मुळशी तालुकाही 90 टक्‍के केरोसिनमुक्‍त झाला असून, जिल्ह्यातील उर्वरित गावे केरोसिनमुक्‍त करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी मागास आणि आर्थिक दुर्बल घटकांना पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत गॅस सिलिंडरची मोफत जोडणी करून दिली जात आहे. जिल्ह्यात 1600 रास्त भाव दुकानांमधून केरोसिन वितरित केले जाते. तेथे आता पॉस मशिनचा वापर करण्यात येईल. 
- दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे 

Web Title: Kerosene distribution is now available through POS machines

टॅग्स