ट्रम्प तात्या बनविणारे आहेत खरंच 'खास रे' (व्हिडिओ)

khaas re
khaas re

पुणे :  'वेबसिरीज' या आताच्या तरुणाईच्या जिव्हाळ्याचा विषय बनत आहेत. दुरचित्रवाणीनंतर इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे अनेकानेक मनोरंजनाची साधने निर्माण होत गेली. त्यातून जन्म झाला वेबसिरिज या नवख्या प्लॅटफॉर्मचा. सुरुवातीच्या काळात इंग्रजी - हिंदी वेबसिरीजला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली, तो आलेख लक्षात घेता आता मराठीतही अनेक वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन वेब-सिरिज युट्युब वर पाहायला मिळत आहेत. याचा उत्तम नमुना म्हणजे तरूणांनी मिळून सुरु केलेला 'खासरे टिव्ही'.

या चॅनलच्या माध्यमातून तरुणाईने डोनाल्ड ट्रम्प, पाबलो शेठ, डेड पूल, थेट भेट अशा विविध मनोरंजनात्मक सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. जागतिकीकरणानंतर भारतातील तंत्रज्ञानात खुप मोठ्या प्रमाणात बदल झाले. इंटरनेट माध्यम आले आणि सर्व प्रकारच्या चौकटी या माध्यमाने तोडल्या. सोशल मिडीया अस्तित्वात आल्याने तरूणांना स्वतःचे विचार मांडण्याचे व्यासपीठ मिळाले. ज्यापध्दतीने फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवर व्यक्त होता येते. अगदी तसेच युट्युबच्या माध्यमातून वेब सिरिज बनवून आताची तरूण पिढी व्यक्त होऊ लागली आहे.

'खासरे टिव्ही'ने यूट्यूबची ही ताकद लक्षात घेऊन डोनाल्ड ट्रम्प या अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला हाताशी धरले होते आणि त्यांच्या आवाजाच्या जागी बार्शी भाषेचा मराठी तडका देत विनोदी डबिंग चित्रफित तयार केली होती.  महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी या व्हिडीओला भरघोस प्रतिसाद देऊन चॅनलला प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले. यूट्यूबबरोबरच सोशल साइट्सवरही याचा गवगवा होऊन अवघ्या सहा महिन्याच्या कालावधीतच या चॅनलने पन्नास हजार सदस्य गोळा केले. या चॅनलवर डोनाल्ड ट्रम्पचे जवळजवळ २९ व्हिडीओ आहेत. डोनाल्ड ट्रम्पनंतर खासरे टिव्हीच्या संजय श्रीधर यांनी पुढे भविष्याचा विचार करत पाबलो शेठ , डेड पूल आणि आता सध्या थेट भेट या वेब सिरिजच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग सुरु ठेवले आहेत.

'खासरे टिव्ही'मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष  डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीमधील मूळ भाषा बाजूला सारत बार्शीतल्या या तरूणांनी त्याला बार्शीचा मराठी तडका देत तो आवाज ऑडिओच्या साहाय्याने जोडला आहे. त्यासोबतच पाबलो शेठ आणि डेड पूललाही असाच आवाज जोडला आहे. त्यामुळे खासरे टिव्ही महाराष्ट्रात खुप मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

युट्युबवर सध्या तरूणाईचे व्यक्त होण्याचे प्रमाण खुप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. कारण युट्युबवर कुठल्याही प्रकारचे सेन्सॉर बोर्डचे बंधन नसल्यामुळे तरूणाईला इथे हवे तसे व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य आहे. खासरे टिव्हीने या व्यासपीठाचा सकारात्मक उपयोग लक्षात घेऊन, तरुणाईची आवड ओळखुन मनोरंजनाच्या माध्यमातून असे अनेक प्रयोग प्रेक्षाकांच्या भेटीस आणले आहे आणि प्रेक्षाकांची याला पसंतीही मिळत आहे.

खासरे टिव्ही टिम - 
संस्थापक - संजय श्रीधर 
संगीत - अमर, रोहीत , विवेक.
गीत लेखन - राहुल काळे
सहाय्यक- शाम सागरे, वैभव चव्हाण, राहुल शिंदे, विश्वजित गवसाने, क्षीतीज केसकर, प्रणय रावल, ऋतूराज होवाळ, कृष्णा जन्नू, सागर मोरे, पारस कांबळे, अमेय पवार, सुधीर पवार, संतोष शिंदे, अक्षय पाडकर, श्रीयोग वाबळे

सुरूवातीला आम्ही डोनाल्ड ट्रम्पचे व्हिडीओ बनवून 'खास रे' ची सुरूवात केली होती. पुढचा विचार करता हा ट्रम्प कंटेन्ट कायम चालणार नाही. लोकांना रोज नवीन काहीतरी हवे असते म्हणून आम्ही आता "थेट भेट" हा नवीन प्रयोग चालू करून प्रेक्षकांना नवीन कंटेन्ट देण्याचा प्रयत्न करित आहोत. 
- रूतूराज होवाळ( खासरे टिव्ही )

खास चित्रपटांचे, खास-रे प्रमोशन
वाढत्या प्रसिद्धीमुळे 'खास-रे' कडे अनेक चित्रपट प्रमोशनसाठी आले. काही निवडक सिनेमांचे खास प्रमोशन करत कित्येक सिनेकलावंत आज या चॅनलचा भाग झाले आहेत. आजपर्यंत 'खास-रे' वर अमेय वाघ, संतोष जुवेकर, वैभव मांगले, पार्थ भालेराव, प्रतीक लाड, सुमंत शिंदे, विजू माने, कुशल बद्रिके, अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव आणि प्रणव रावराणे अशा विविध कलाकारांनी काम केले आहे. तसेच फॉक्सस्टार सारख्या एका जागतिक दर्जाच्या स्टुडीओने 'खास-रे'च्या मराठी डेडपुलची दखल घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com