खडकवासलातून 4 हजार क्युसेक वेगाने विसर्ग

बुधवार, 24 ऑगस्ट 2016

खडकवासला - चार धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मंगळवार सायंकाळपासून पाऊस सुरु झाल्याने खडकवासला धरणातून आज (बुधवार) दुपारी एक वाजता चार हजार 280 क्युसेक वेगाने पाणी मुठा नदीत सोडण्यास सुरुवात झाली.

चारही धरणात 28.67 टीएमसी म्हणजे 98.37 टक्के पाणीसाठा झाला आहे. खडकवासला, पानशेतसह वरसगाव धरण 100 टक्के भरलेली आहेत. परंतु टेमघर धरण 87.19 टक्के भरले आहे. या चार धरण क्षेत्रात पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे या धरणातुन पाणी सोडले जात आहे. 

पानशेत धरणातून 990 क्युसेक वीज निर्मितीसाठी 600 क्युसेक पाणी आंबी नदीत सोडले. वरसगाव धरणातून 1777 क्युसेक वीज निर्मितीसाठी 566 क्युसेक पाणी मोसे नदीत सोडले. टेमघर धरणातून 290 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. अशाप्रकारे या 3 धरणातील 4223 क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा होत आहे. त्यामुळे, खडकवासला धरणातून 4280 क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले आहे. कालव्यातून 1267, बंद जलवाहिणीतून 325 क्युसेक पाणी असे 5872 क्युसेक पाणी धरणातून बाहेर जात आहे. टेमघर येथे सकाळ पासून दुपारी 12 वाजेपर्यंत 15, पानशेतला 11, वरसगावला 12, खडकवासला येथे 3 मिमी पाऊस पडला आहे.

पुणे

पुणे : महापालिकेच्या कागदोपत्री बाणेर-बालेवाडी झपाट्याने विकसित होत असल्याचा उल्लेख असला तरी, या भागातील पाण्याचा प्रश्‍न तितकाच...

03.03 AM

सोमेश्वरनगर : शिक्षणहक्काच्या (आरटीई) धोरणानुसार वंचित व दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवून त्यांना मोफत शिक्षण...

01.33 AM

ऑडिओ क्लिप पोचली मुख्यमंत्र्यांपर्यंत पुणे : पुण्याचे राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी एका प्रकरणावरुन कोथरुडच्या आपल्याच...

शनिवार, 24 जून 2017