खडकवासलातून 2 हजार क्‍युसेसेक्‍सने पाणी सोडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जुलै 2016

पुणे - पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला धरण आज (मंगळवार) सकाळी 9 वाजता 92 टक्के भरले. त्यामुळे धरणातून दोन हजार 80 क्‍युसेसेक्‍सने पाणी सोडण्यास सुरवात झाली. तर आज दुपारी तीननंतर 4 हजार क्‍युसेसेक्‍स पाणी सोडण्यात येणार आहे. 

पुणे - पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे खडकवासला धरण आज (मंगळवार) सकाळी 9 वाजता 92 टक्के भरले. त्यामुळे धरणातून दोन हजार 80 क्‍युसेसेक्‍सने पाणी सोडण्यास सुरवात झाली. तर आज दुपारी तीननंतर 4 हजार क्‍युसेसेक्‍स पाणी सोडण्यात येणार आहे. 

पानशेत, वरसगाव, टेमघर धरणातून पाणी सोडले नसतानाही पाणलोट क्षेत्रातील झालेल्या पावसामुळे खडकवासला धरण भरले आहे. या परिसरात 328 मिमी पाऊस पडला. त्यामुळे धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या फुटाने उघडण्यात आले आहेत. एका दरवाज्यातून 416 क्‍युसेसेक्‍स याप्रमाणे धरणातून एकूण 2080 क्‍युसेसेक्‍स पाणी सोडले आहे. याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, यांनी माहिती दिली. 

पाणी सोडण्यापूर्वी शेलार यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी शाखा अभियंता आर. एस. क्षीरसागर, तानाजी जगताप, आर. जी. हांडे उपस्थिस्त होते. खडकवासलात 1 जुलै रोजी 1.47 टीएमसी पाणीसाठा धरणात शिल्लक होता. आज सकाळी चारही धरणात मिळून सकाळी सहा वाजता 11.58 टीएमसी म्हणजे 39.72% पाणीसाठा झाला आहे. हा पाणीसाठा शहराला 290 दिवस पुरेल एवढे पाणी जमा झाले आहे. पाणी सोडण्यासाठी इशारा म्हणून 9.49 वाजता पहिला भोंगा वाजविण्यात आला.
 

 

चार हि धरणातील एकूण पाणीसाठा टीएमसी मध्ये 
चालू वर्षी   11.58 TMC, 39.72% 
मागील वर्षी 7.14 TMC, 24.50%

पुणे

पुणे : बालगंधर्व रंगमंदिराच्या मंचावरून नाटक सादर करण्याआधी रंगमंदिराच्या तळमजल्यात असलेल्या हॉलमध्ये तालीम व्हायची... हा हॉल...

06.33 AM

पुणे : सुरत-अहमदाबाद मॉडेलच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आठपदरी रिंगरोड होणार आहे. तब्बल 129...

05.33 AM

पुणे : महापालिकेच्या कागदोपत्री बाणेर-बालेवाडी झपाट्याने विकसित होत असल्याचा उल्लेख असला तरी, या भागातील पाण्याचा प्रश्‍न तितकाच...

03.03 AM