‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल' नामकरण सोहळा अनुराग सिंह ठाकूर यांच्या उपस्थितीत

विविध क्रीडा प्रकारांच्या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी होणार.
Savitribai Phule Pune University
Savitribai Phule Pune UniversitySakal
Summary

विविध क्रीडा प्रकारांच्या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण येत्या शनिवारी होणार.

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात नव्याने साकारण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारांच्या संकुलाचे ‘खाशाबा जाधव क्रीडा संकुल’ नामकरण सोहळा आणि पै. खाशाबा जाधव व स्वामी विवेकानंद यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या शनिवारी (ता. २८) सकाळी दहा वाजता होणार आहे, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

क्रीडा संकुलाच्या नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. दीपक माने, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते. विद्यापीठातील हे भव्य क्रीडा संकुल तब्बल २७ एकर परिसरात साकारण्यात आले आहे. या संकुलाच्या नामकरणाचा सोहळा क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ कार्यालयाशेजारील क्रीडा संकुलातील इनडोअर हॉलमध्ये होणार आहे. विद्यापीठातील क्रीडा स्पर्धांबरोबर, महाविद्यालयीन, शालेय क्रीडा स्पर्धांसाठी देखील लवकरच हे क्रीडा संकुल खुले होईल. मात्र, त्याबाबत नियमावली आणि ध्येय धोरणांचा सविस्तर आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. या संकुलामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यास मदत होणार आहे. यातून नक्कीच चांगले खेळाडू तयार होतील’, असे डॉ. माने यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीय दर्जाची आणखी तीन क्रीडांगणाची प्रतीक्षा

‘विद्यापीठात लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्विमिंगपूल, क्रिकेट आणि अस्ट्रो टर्फ हॉकी क्रीडांगण तयार करण्यात येणार आहे,’ अशी माहिती डॉ. माने यांनी यावेळी दिली.

‘खाशाबा जाधव क्रीडा संकुला’चे वैशिष्ट्ये -

- सिंथेटिक ॲथलेटिक ट्रॅक, फुटबॉल, अस्ट्रो टर्फ लॉन टेनिस कोर्ट

- आंतरराष्ट्रीय मानकांनुसार शूटिंग रेज

- अद्ययावत व्यायामशाळा

- खो-खो, कबड्डी, कॉर्फ बॉल, हॅण्डबॉल असे मैदानी खेळाचे क्रीडांगण

- बहुउद्देशीय इनडोअर हॉल

- बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, ज्यूदो, कराटे, नेटबॉल, टेबल टेनिस

- कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स असे विविध क्रीडा प्रकार खेळात येणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com