कात्रज घाटरस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

खेड शिवापूर - कात्रज घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे त्रासदायक झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. 

खेड शिवापूर - कात्रज घाटातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे त्रासदायक झाले असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. 

काही महिन्यांपूर्वी कात्रज घाटातील जुना बोगदा-भिलारवाडीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आल्याने हा रस्ता सुस्थितीत आहे. मात्र शिंदेवाडी हद्दीतील आणि भिलारवाडी ते कात्रज पर्यंतचा घाट रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.  या ठिकाणच्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. पावसामुळे त्यांत पाणी साचून अपघात होत असून येथील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे. दरवर्षी या ठिकाणी खड्ड्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. मात्र माती आणि मुरूम टाकून खड्डे बुजविण्यापलीकडे सार्वजनिक बांधकाम विभाग काही उपाययोजना करत नाही. या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.