अपहृत अपंग शेतकऱ्याची सुटका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

वालचंदनगर - जमीन खरेदी-व्रिकी व्यवहाराच्या कारणावरून खंडणीसाठी अपंग शेतकऱ्यासह दोघांचे अपहरण करणाऱ्या सात जणांच्या टोळीला वालचंदनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, चार मॅगझिन, ३४ बुलेट (गोळ्या), दोन चारचाकी गाड्या व २ लाख २४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली.

या घटनेत अपंग शेतकरी दत्तू नारायण सावंत (वय ५२, रा. सुगाव) व त्यांचा चालक सुनील युवराज कडाळे (वय २५, रा. दोघे इंदापूर) यांची सुखरूप सुटका करण्यात आली. 

या प्रकरणी अशोक श्रीरंग सकपाळ (वय ३८), राजू शशिकांत ऊर्फ काशिनाथ जाधव (वय ३५), स्वप्नील निरंजन गुरव (वय २६, रा. तिघे गोरेगाव ईस्ट मुंबई), नितीन चंद्रकांत जाधव (वय २५, रा. मालाड ईस्ट, मुंबई), युवराज ऊर्फ गोपाळ सुरेश शिरधनकर (वय २७, रा. गोरेगाव पूर्व, मुंबई), उज्ज्वल जेठालाल छेडा (वय २३, मालाड ईस्ट, मुंबई), किशोर नारायण सकपाळ (वय ३३, कोपरखैरणे, नवी मुंबई) यांना पोलिसांनी अटक केली.