महापालिकेच्या वाचनालयातच जुगार आणि मद्यपान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

कोथरुड - आझादनगर येथील सुतार दवाखाना चौकात असलेल्या महापालिकेच्या पांडुरंग रामभाऊ वानवडे वाचनालयाची दुरवस्था झाली आहे. तिथे जुगार, मद्यपान असे प्रकार घडत असल्याने परिसरातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. 

महापालिकेने चार वर्षापूर्वी वाचनालयाचे उद्‌घाटन केले. मात्र, काही दिवस सुरळीत चालल्यानंतर याकडे दुर्लक्ष करण्यात आले. वाचनालयात सध्या गवत व झाडे उगवलेली असून, मद्यपी रात्रीच्या सुमारास झोपण्यासाठी त्याचा वापर करतात. महापालिकेने वाचनालयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले असून, त्याचा गैरवापर करण्यात येत आहे. 

स्थानिक नागरिक राजाराम वानवडे म्हणाले,‘‘आझादनगर परिसर रहदारीचा असल्याने सतत नागरिकांची वर्दळ असते. नागरिकांच्या सेवेसाठी सुरु केलेले वाचनालय गेल्या तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. वाचनालयात सुरु असलेल्या अनुचित प्रकारामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हा त्रास थांबविण्यासाठी वाचनालयाची नव्याने डागडुजी करुन पुन्हा सुरु करावे अथवा कायमस्वरूपी बंद करावे.’’

वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाचनालयाची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणचा रस्ता अरुंद असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी काही दिवसांत वाचनालयाची जागा बदलण्यात येणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या गैरप्रकाराचा त्रास स्थानिकांना होत असून, याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले आहे.
- वासंती जाधव, स्थानिक नगरसेवक