महापालिका आयुक्तांसाठीही आता 'केआरए'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे : महापालिका आयुक्तांनाही राज्य सरकारने आता 'केआरए' निश्‍चित केला आहे. त्यासाठी शंभर गुण दिले असून या गुणांच्या आधारे आयुक्तांचे गोपनीय अहवाल तयार केले जाणार आहेत.

"केआरए' मध्ये घनकचरा व्यवस्थापनास सर्वाधिक 30 गुण देण्यात आले आहेत. करवसुलीसाठी वीस, स्वउत्पन्नवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांसाठी वीस, पायाभूत प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी दहा, स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी दहा, तर सेवा हमी कायद्याची अंमलबजावणी व इतर प्रशासकीय बाबींसाठी दहा गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांनाही आपला "परफॉमन्स' दाखवावा लागणार आहे.