कुकडी प्रकल्पातील साठ्यात वाढ

Kukdai Dam Water
Kukdai Dam Water

नारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू झाला. पावसामुळे कुकडी प्रकल्पाच्या उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. 

कुकडी प्रकल्पात सोमवारी सायंकाळी चारपर्यंत १० हजार ७९१ दशलक्ष घनफूट (३५.३३ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठ्यात गेल्या सात दिवसांत ६ हजार ४१६ दशलक्ष घनफूट (२१ टक्के) वाढ झाल्याची माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे उपअभियंता माणिक भालेराव, प्रकाश मांडे यांनी दिली.

जुन्नर तालुक्‍यात ९ जुलैपासून पावसाला सुरवात झाली. मागील चार दिवसांपासून तालुक्‍यात ढगाळ वातावरण असून, रिमझिम पाऊस सुरू आहे. सोमवारी सकाळपासून पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणसाठ्यात वाढ झाली असून, सायंकाळी चारपर्यंत सरासरी २५ मिलिमीटर पाऊस झाला. ९ जुलै २०१८ रोजी कुकडी प्रकल्पात १४.२९ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. चार वाजेपर्यंत प्रकल्पात ३५.३३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. दरवर्षी १ ऑगस्टपासून धरणात पाणीसाठा करण्यास सुरवात होते. यामुळे वडज धरणाचे दरवाजे बंद न केल्यामुळे वडज धरणातून मीना नदीपात्रात ३ हजार ९७२ क्‍युसेक पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने यामुळे मीना नदीला पूर आला आहे. मागील वर्षी आजअखेर कुकडी प्रकल्पात १० हजार ८३२ दशलक्ष घनफूट (३५.४७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.

धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा पुढीलप्रमाणे (दशलक्ष घनफूट) 
येडगाव- १ हजार १८०, माणिकडोह- २ हजार ६४७, वडज- ६१८, डिंभा- ६ हजार २७३. पिंपळगाव जोगे धरणात २ हजार ५९४ दशलक्ष घनफूट मृतसाठा झाला असून, मृतसाठ्यात ८२६ दशलक्ष घनफूट वाढ झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com