समाजामध्ये संस्काराचा अभाव - राणे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

पुणे - 'देशातील नागरिकांची बौद्धिक पातळी उंचावत असली तरी, सामाजिक नैतिकता हरवत आहे. यामुळेच मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावतानाही नागरिक पैसे घेतात. भावी पिढीवर चांगले संस्कार घडविण्याची जबाबदारी असणारे शिक्षकदेखील यामध्ये सहभागी असतात. यामुळेच समाजामध्ये संस्काराचा अभाव आहे,'' असे मत कॉंग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.

अभिजित कदम मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने आयोजित "अभिजित कदम मानवता पुरस्कारा'चे राणे यांच्या हस्ते वितरण झाले. संस्थात्मक कार्यासाठीचा पुरस्कार नाम फाउंडेशनला, तर व्यक्तिगत पुरस्कार जीवरक्षक राजेश काची यांना प्रदान करण्यात आला. भारती विद्यापीठाचे संस्थापक कुलपती डॉ. पतंगराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, न्यासाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. विश्वजित कदम, मोहन कदम उपस्थित होते. संस्थात्मक कार्यासाठी एक लाख, तर व्यक्तिगत पुरस्कारासाठी 25 हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या प्रसंगी "नाम'तर्फे मकरंद अनासपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या संयोजनाबद्दल आणि पुरस्कारांबद्दल डॉ. कदम यांनी प्रास्ताविकात माहिती दिली.