जैनकवाडीत रणरागिणींनी उभी बाटली केली आडवी

ladies
ladies

शिर्सुफळ (पुणे) : बारामती तालुक्याच्या औद्योगिक वसाहती लगत असलेल्या जैनकवाडी येथील रणरागिणी एकवटल्या आणि कोणत्याही दबावाला न झुगारता त्या निर्भय पणे मतदानात सहभागी झाल्या व गावच्या प्रवेशद्वारावरच असेल्या विदेशी दारूच्या दुकानाची उभी बाटली 267 विरुद्ध 10 मतांनी आडवी केली.

विविध शासकिय पुरस्कार मिळालेले बारामती तालुक्यातील जैनकवाडी हे गाव. मात्र गेल्या काही वर्षापासुन गावाच्या प्रवेशकमानीच्या जवळ ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी न घेता विदेशी मद्य विक्रीचा पंचतारांकित उद्योग सुरु करण्यात आला. तसेच या परिसरात लाँजवर विविध अवैध धंदेही केले जात असल्याचा ग्रामस्थांचा आरोप होता.याबाबत ग्रामस्थांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. याची दखल घेवुन आयुक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने बारामती तहसिल कार्यालयाच्या माध्यमातुन गुरुवारी (ता.31) महिला मतदान झाले. यामध्ये एकुण 392 महिला मतदारांपैकी 300 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला यामध्ये आडव्या बाटलीसाठी( दारुबंदी)  267 मतदान व विरोधी 10 मतदान झाले. तर 23 मते बाद झाली.यामुळे तेथील उभी बाटली आडवी झाली. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन निवासी तहसिलदार आर.सी.पाटील यांनी तर केंद्राध्यक म्हणुन स्वाती गायकवाड यांनी काम पाहिले.दरम्यान प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी मतदान केंद्राला भेट देऊन माहिती घेतली.

यावेळी उत्पादन शुल्क विभागाचे निरिक्षक एस.डी.चौगुले, दुय्यम निरिक्षक राजन साळोखे, शोभा लांडगे, एस.व्हि मोरे, एस.के.कान्हेकर यांच्या तालुका पोलिस स्टेशनचे  बिट अंमलदार मारुती हिरवे, कुंभार, ग्रामसेवक गायकवाड, तलाठी महेश वाघ उपस्थित होते.

ग्रामपंचायत दप्तरी नोंदच नाही...
या गावात प्रवेशद्वारावरच टोलेजंग इमारतीत पंचतारांकित विदेशी मद्य विक्री,  वातानुकूलित लाॅज सुरु आहे.याबाबत ग्रामपंचायत दप्तरी कसलीही बांधकामाची नोंद नाही. तसेच ग्रामपंचायतीची मद्य विक्री परवानासाठी कसलीही परवानगी घेण्यात आली नाही.यामुळे या दुकानाला देण्यात आलेल्या परवान्याचीच चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com