विघ्नहर साखर कारखान्याच्या मिल रोलरचा शुभारंभ

vighnahar
vighnahar

जुन्नर- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या २०१८-१९ च्या गळीत हंगामाच्या पूर्वतयारीची कामे सुरू असून, मंगळवारी ता.10 रोजी मिलचे रोलर पूजन उपाध्यक्ष अशोक घोलप, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब काकडे, संतोषनाना खैरे यांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी दिली.
 यावेळी शेरकर, सर्व संचालक, विशेष लेखापरीक्षक संजय शेलार, कारखान्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

शेरकर म्हणाले, कारखान्याला पुढील गाळप हंगामासाठी सुमारे १२ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. त्यासाठीचे ऊस तोडणीचे नियोजन केले असून, ट्रॅक्टर टायर गाडी व टायर बैल गाडी असे एकूण १३०० टायर गाड्या व ३२५ वाहन टोळीचे करार करण्याचे नियोजन आहे. करार करण्याचे काम सुरू आहे. गाळप हंगाम २०१७-१८ मधील गाळप केलेल्या सर्व ऊसाचे एफआरपी प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले आहे.

आडसाली ऊस लागवडीसाठी दि.१ जुलै ते ३० ऑगस्ट २०१८ अखेर पर्यंतचा कालावधी ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये को-८६०३२, कोएम-०२६५ या ऊसाच्या जातिंना परवानगी देण्यात आली आहे. पूर्वहंगामी लागवडीसाठी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून, यामध्ये को-८६०३२, कोसी-६७१, व्हीएसआय-०८००५, कोएम-०२६५ या ऊस जातींना परवानगी देण्यात आली आहे. सुरू हंगामासाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी पर्यंतचा कालावधी देण्यात आला असून यामध्ये को-८६०३२, कोसी-६७१, व्हीएसआय-०८००५, एमएस-१००१ या जातींना परवानगी देण्यात आली आहे. कारखान्याच्या वतीने कार्यक्षेत्रातील सभासद व ऊस उत्पादक यांचे मागणी प्रमाणे वरील ऊस जातीच्या ऊसाचे बेणे १ जुलै २०१८ पासून वाटप करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले

कारखाना प्रथम पासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उधारी तत्वावर ऊस बेणेचा पुरवठा करीत आहे. एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी कारखान्याने ऊस विकास विभाग हा स्वतंत्र विभाग कार्यरत केलेला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना त्यांचे बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे, मेळावे घेऊन शेतकऱ्यांना माहिती देणे इत्यादी उपक्रम राबवित आहे. ऊस विकास विभागाच्या मार्गदर्शनाचा फायदा ऊस उत्पादक शेतकरी वर्गाने घ्यावा, त्यामुळे एकरी उत्पादन वाढविण्यास मदत होणार असल्याचे शेरकर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com