लिव्ह इन रिलेशनशिपनंतर वेबसाइटवर अश्‍लील व्हिडिओ

Crime
Crime

पुणे - लिव्ह इन रिलेशन शिपमध्ये राहिल्यानंतर तरुणाच्या वाईट गोष्टी समजल्याने दुसऱ्याबरोबर लग्न केल्यामुळे चिडलेल्या युवकाने संबंधित तरुणीचे अश्‍लील व्हिडिओ बेवसाइटवर टाकून बदनामी केली. या प्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत २५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार गोव्यात राहणाऱ्या युवकावर विनयभंग व आयटी ॲक्‍टनुसार गुन्हा दाखल केला आहे. युवती आणि युवक हे मूळचे गोव्यातील आहेत. एका मेट्रोमोनी साइटवरून दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच, दोघे काही वर्षे लिव्ह इनमध्ये पुण्यात राहत होते. यादरम्यान तरुणीला आरोपीच्या व्यसनाची माहिती झाली. त्यामुळे तिने लग्न करण्यास नकार दिला आणि ती त्याला सोडून गेली. 

काही दिवसांनी त्या तरुणीने लग्न केले. त्याची माहिती युवकाला समजली. त्यामुळे युवकाने युवतीचे अश्‍लील व्हिडिओ तयार करून ते एका वेबसाइटवर टाकले. तसेच, तिचे फेसबुकवर बनावट अकाउंट तयार केले. त्यावरही हे अश्‍लील फोटो व व्हिडिओ टाकले. त्याची लिंक युवतीच्या मित्र व मैत्रिणींना पाठविली. हा प्रकार समजल्यानंतर संबंधित युवतीने समर्थ पोलिसांकडे तक्रार दिली. संबंधित युवती खासगी ठिकाणी नोकरी करते, तर युवक हा बेकार आहे. समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, युवकाचा शोध सुरू आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com