ओतूर परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच

पराग जगताप 
बुधवार, 11 जुलै 2018

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. दोन दिवसांत दोन वेळा झालेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.याबाबत उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

जुन्नर - जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात बिबट्याचे हल्ले सुरुच आहेत. दोन दिवसांत दोन वेळा झालेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले आहेत.याबाबत उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाच्या कारभाराबाबत नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

ओतूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीत सायंकाळी भाजीपाला विक्री करुन परत घरी जाणार्या शेतकर्यावर बिबट्याने अनेकदा हल्ले केल्याच्या घटना घडत आहे. नुकतेच रविवारी व सोमवारी दोन दिवस सलग बिबट्याने रात्रिच्या वेळी दुचाकि वरुन घरी जात असलेल्या व्यक्तीवर हल्ला करुन जखमी केले आहे.यात प्रमुख्याने ओतूर, अहिनवेवाडी फाटा, वाघचैरे वस्ती मार्गे मांदारणे या व अहिनवेवाडी फाटा ते सारणी व चिल्हेवाडी पाचघर या मार्गावर बिबट्याचे हल्ले होत असताता.

रविवारी रात्री अकरा दरम्यान ओतूर येथून चिल्हेवाडीला जात असलेल्या हनुमंत दामोदर भोईर वय.20 रा.चिल्हेवाडी ता.जुन्नर यांच्या दुचाकिवर बिबट्याने शेटेवाडी परिसरात हल्ला करुन त्याना जखमी केले.तर सोमवारी रात्री साडे सात दरम्यान मार्केट मध्ये मिरची विकुन परत दुचाकीवर अहिवनेवाडी मार्गे मांदारणेला चाललेल्या शांताराम महाकाळ व बाळु उंबरे यांच्या दुचाकिवर बिबट्याने अचानक वाकचौरे मळ्या जवळ हल्ला केला.यात बाळु उंबरे वय.50 रा.मांडवे ता.जुन्नर (संध्या मांदारणे) ह्याना जखमी केले.

दोन्ही दिवस जखमीना ओतूर प्रथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोउपचार करुन बिबट प्रतिबंधक लस देण्यासाठी पिंपरीचिंचवड येथिल वाय.सी.एम ह्या शासकिय दवाखान्यात नेण्यात आले.

ओतूर वनविभागाने अहिनवेवाडी फाटा ते मांदारणे व अहिनवेवाडी फाटा ते सारणी व चिल्हेवाडी पाचघर यामार्गेवर व परिसरात दररोज रात्री गस्त घालने गरजेचे आहे कारण या मार्गावर व परिसरात या आधिही बिबट्याने नागरिकावर अनेकदा हल्ले केले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्याबाबत  मांदरणे गावचे उपसरपंच विष्णु बाळशिराम भोर, भीमसेन महाकाळ,बाळु छबुराव महाकाळ, अशोक अहिनवे, नामदेव शेटे यानी वनविभागाने या परिसरात त्वरीत रात्रीची गस्त सुरु करुन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणि केली आहे.

Web Title: Leopard attack in Outer area