कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी महापौरांचे आयुक्तांना पत्र 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 मे 2018

पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे द्यावा, असे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांना दिले आहे. यावर आयुक्त काय भूमिका घेणार?, याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

पुणे - महापालिका कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार ग्रेड पे द्यावा, असे पत्र महापौर मुक्ता टिळक यांनी आयुक्तांना दिले आहे. यावर आयुक्त काय भूमिका घेणार?, याकडे पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

बढतीनंतर कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात वाढ होण्याऐवजी, आहे त्या पगारातच कपात होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. "सकाळ'ने याकडे लक्ष वेधल्यांनतर पालिका कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. गेल्या सोमवारी झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावर जोरदार चर्चाही झाली. तेव्हा कर्मचाऱ्यांची बाजू घेत सर्व पक्षीय सदस्यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनाकडून चुकीचा अर्थ लावून अंमलबजावणी केली जात असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर महापौरांनी सर्वसाधारण सभेत ग्रेड पेनुसारच कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. 
दरम्यान, यासंदर्भात महापौरांनी लेखी पत्र आयुक्तांना दिले आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात दावा दाखल आहे. त्याचा निकाल येत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसारच ग्रेड पे द्यावा. निकाल आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करावी, असेही या पत्रात म्हटले आहे. 

Web Title: Letter to the Mayor's Commissioner for the salary of the employees