खुद्द ऋषी कपूरकडून ऐका किस्से

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 मे 2017

पुणे - ‘बॉबी’ या आपल्या पहिल्याच चित्रपटासाठी अभिनयाचे पारितोषिक मिळविल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपली रोमॅंटिक हिरोची प्रतिमा अबाधित ठेवणारे अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेली रोमॅंटिक गाणी ऐकण्याची आणि त्या गाण्याशी संबंधित फिल्म इंडस्ट्रीतले किस्से खुद्द ऋषी कपूर यांच्याकडून ऐकण्याची संधी ‘सकाळ’ने आणली आहे. सोमवारी (ता. १) सायंकाळी गणेश कला क्रीडा मंच येथे होणारा ‘बचना ऐ हसीनों... लो मैं आ गयाऽऽ’ हा कार्यक्रम होत आहे.

‘प्रीझम फाउंडेशन’ या संस्थेच्या मदतीसाठी होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक असून, ‘सिस्का एलईडी’ आणि ‘ऑक्‍सिरिच’ प्रायोजक तर ‘एमपी ग्रूप’ आणि ‘नॅशनल एग कोऑर्डिनेशन कमिटी’ सहप्रायोजक आहेत.  

ऋषी कपूर यांच्या चित्रपटांमधील जवळपास सत्तावीस ते अठ्ठावीस गाणी या कार्यक्रमात सादर होणार आहेत. त्यामध्ये गझल, काही रोमॅंटिक गाणी आहेत आणि कव्वालीही आहे.