सिगारेट भरलेला कंटेनरच वरसोलीत चोरट्यांनी पळविला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

लोणावळा - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाक्‍यावरून कंटेनर चालकास बेदम मारहाण करीत चोरट्यांनी सुमारे दोन कोटी रुपयांच्या सिगारेटने भरलेला एक कंटेनर पळविला. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. कंटेनरचालक कलाम अहमद शमिर खान (वय ४१, रा. नवरंग कंपनी प्लॉट नं. १७,  धारावी, मुंबई) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाठलाग करीत आलेल्या काळ्या रंगाच्या मोटारीतील आठ ते दहा जणांनी लोणावळ्याजवळील वरसोली टोलनाक्‍याजवळ सिगारेटने भरलेला कंटेनर (एमएच १२ एचडी ६००८) अडविला. या वेळी चोरट्यांनी कंटेनरचालक कलाम खान याला बेदम मारहाण करून कंटेनर घेऊन गेले. कंटेनरमध्ये सिगारेटचे सुमारे एक कोटी ८७ लाख ५४ हजार ८१७ रुपये किंमतीचे ८६५ बॉक्‍स होते. यासह १५ लाख रुपये किंमतीचा कंटेनर व रोख रक्कम असा तब्बल दोन कोटी दोन लाख ६३ हजारांचा माल लंपास केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आठ ते दहा चोरट्यांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या सहायक पोलिस निरीक्षक साधना पाटील तपास करीत आहेत.

Web Title: lonavala news Cigarette theft