लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे "मराठी संमेलन' रंगणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे - जगभरातील मराठी माणसांना एकत्र आणणे आणि त्यांच्यात साहित्य-संस्कृतीचे बंध निर्माण करण्यासाठी "लंडन महाराष्ट्र मंडळा'ने 2 ते 4 जूनदरम्यान, "लंडन मराठी संमेलन' आणि "पहिली ग्लोबल मराठी व्यावसायिक परिषद' आयोजित केली आहे. हे कार्यक्रम लंडनमध्ये होणार आहेत. 

दोन व तीन जूनला भारतातील आणि ग्रेट ब्रिटन येथील मराठी व्यावसायिकांची परिषद होणार असून, तीन व चार जूनला संमेलन होईल. या संमेलनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार आणि डॉ. विनिता आपटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मंडळाला 85 वर्ष झाल्याच्या निमित्ताने हे कार्यक्रम होणार आहेत. परिषदेत जगभरातील व्यावसायिक सहभागी होणार आहेत, तर संमेलनात "नादवेद' हा सांगीतिक कार्यक्रम, समीर चौगुले यांचा विनोदी कार्यक्रम, "मोक्ष' या बॅंडचे परफॉर्मन्स, "स्वयम्‌' या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींशी गप्पांचा कार्यक्रम आणि "महाराष्ट्र माझा' असे कार्यक्रम होतील. 

खास अभ्यासक्रम तयार 
""लंडनमधील 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी मराठीचे वर्ग घेण्यात येतात. जानेवारीपासून या दहा आठवड्यांच्या वर्गाची सुरवात होते. लंडनमध्ये राहूनही मुलांना मराठी शिकता यावी, यासाठी हे वर्ग घेतले जातात. "भारतीय भाषा संघटने'च्या दिलीप पेडणेकर यांनी त्यासाठी खास अभ्यासक्रम तयार केला आहे. त्यानुसार त्यांनी काही प्रतिनिधींना त्याचे प्रशिक्षण दिले असून, हे प्रतिनिधी मुलांचे वर्ग घेतात. दरवर्षी या वर्गात जवळजवळ 25 मुले सहभागी होतात,'' अशी माहिती सुशील रापतवार यांनी दिली. 

Web Title: london marathi sammelan