सुट्या पैशांचे बँकांना ‘दान’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

श्रीमंत दगडूशेठ गणपतीसमोर पंधरा दिवसांत १८ लाख

पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने दानपेटीत जमलेली सुमारे १८ लाख ३६ हजार ८३८ रुपये आणि कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरानेही १ लाख १ हजार ७३१ रुपये एवढी रक्कम शनिवारी बॅंकेत भरली. दोन्ही मंदिरात जमा झालेल्या रकमेपैकी शंभरच्या नोटांचे प्रमाण सर्वाधिक होते. तर पाचशे, हजार आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण तुलनेने मर्यादित होते. 

विधी व न्याय खात्याने दिलेल्या आदेशानुसार आणि नागरिकांची सध्याची सुट्या पैशांची गरज भागावी यासाठीच दोन्ही ट्रस्टच्या विश्‍वस्तांतर्फे भाविक आणि धर्मादाय आयुक्तालयाचे निरीक्षकांसमोर दानपेटीतील रक्कम मोजण्याचा निर्णय घेण्यात आला होता. 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मोजणी करतेवेळी अध्यक्ष अशोक गोडसे, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, डॉ. रा. वि. परांजपे, उत्तमराव गावडे, महादेव पवार, तानाजी शेजवळ, शिवराज जगधने, विशाल सातारकर उपस्थित होते.   

कै. लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरातर्फे अध्यक्ष ॲड. एन. डी. पाटील, बी. एम. गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, ॲड. शिवराज कदम तर धर्मादाय आयुक्तालयातर्फे निरीक्षक कैलास महाले उपस्थित होते. मोजणीनंतर जमा झालेल्या रकमेचा बॅंकेत भरणा करण्यात आला.

ट्रस्टचे अध्यक्ष गोडसे म्हणाले,‘‘धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दररोज निरीक्षक पाठविले, तर त्यांच्या समोर मोजणी करण्याची ट्रस्टची तयारी आहे. वेळप्रसंगी दानपेटीत दररोज जमा झालेल्या निधीचा तपशीलही फलकावर लावण्याची आमची तयारी आहे.’’

दत्त मंदिरात शंभरच्या २१३ नोटा
गणपती मंदिरात दोन हजारच्या १६, तर हजारच्या २२३, पाचशेच्या ८३३ नोटा मोजणी करतेवेळी मिळाल्या. तर दत्त मंदिरात हजारच्या पाच आणि पाचशेच्या ३६ नोटा मिळाल्या. मात्र, गणपती मंदिरात आणि दत्त मंदिरात शंभरच्या नोटांचे प्रमाण अनुक्रमे ६५१६ आणि २१३ एवढे होते. दोन्ही मंदिरांत मागील पंधरा दिवसांपासून दानपेटीत जमा झालेल्या रकमेची मोजणी भाविकांच्या समोर करण्यात आली.

टॅग्स

पुणे

पुणे - स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रगीताचे सामूहिक गायन झाल्यावर ताशांचा थर्रार अन्‌ टिपरूच्या ठेक्‍यावर ढोल वाजवत पथकांचे...

05.06 AM

पुणे -  घटना-१ : बिबवेवाडी येथील ज्येष्ठ नागरिक दत्तू कसबे... वय वर्षे ८०. आयुष्यभर कष्ट करून त्यांनी कुटुंबाचा...

04.33 AM

मातोश्री रमाबाई आंबेडकर वस्तीमधील (ताडीवाला रस्ता) एका छोट्याशा झोपडीत राहणारा अभिमान ऊर्फ अभिमन्यू सूर्यवंशी. इतरांप्रमाणेच...

04.33 AM