खासगी वाहतूकदारांकडून लूट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पिंपरी - खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांना जादा भाडे घेता येणार नाही. असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे आदेश राज्य सरकारकडून काढण्यात आले आहेत. मात्र, खासगी प्रवासी वाहतूकदार याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

सध्या उन्हाळी सुट्या सुरू असल्याने खासगी प्रवासी भाड्यात ३० ते ४० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. येत्या १० जूनपर्यंत ही परिस्थिती कायम राहणार असल्याचा खासगी वाहतूकदारांचा अंदाज आहे. 

नागपूर-नांदेडसारख्या दूरच्या, तसेच राज्याबाहेर जाण्यासाठी प्रवासी खासगी बसचा वापर करीत आहेत. रेल्वेगाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे. तर, राज्य परिवहन महामंडळाच्या पुरेशा वातानुकूलित बस नाहीत. नाइलाजास्तव प्रवाशांना खासगी वाहतुकीचा पर्याय निवडावा लागत आहे. त्याचा फायदा खासगी वाहतूकदार घेत आहेत. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.

राज्य सरकारने नियम केल्यानंतरदेखील खासगी वाहतूकदारांकडून भाडेवाढ सुरूच आहे. परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये लक्ष घालावे. सुट्यांच्या काळात राज्य परिवहन महामंडळ आणि रेल्वेने जादा गाड्या सोडाव्या. 
- काशिनाथ पाटील, प्रवासी 

परिवहन कार्यालयाकडून 65 खासगी बसवर कारवाई
पिंपरी - प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणाऱ्या खासगी बसचालकांवर परिवहन कार्यालयाने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात आतापर्यंत ६५ बसवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १८ लाख ७८ हजार १४ रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे. परिवहन कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईत २३ बस जप्त करण्यात आल्याचे पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांनी सांगितले. 

परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून निगडी, कासारवाडी या भागात ही कारवाई करण्यात आली. अवाजवी भाड्याची आकारणी करण्याव्यतिरिक्‍त कागदपत्रांची पूर्तता न करणे, टप्पा पद्धतीने प्रवासी वाहतूक करणे आदी कारणांचा त्यामध्ये समावेश आहे. 

या कारवाईत एक लाख ६५ हजार ३० रुपये दंडापोटी, तर १७ लाख १२ हजार ७१४ रुपये कराच्या थकबाकीची रक्‍कम वसूल करण्यात आली आहे. 
प्रवाशांकडून जादा भाडे आकारले जात असेल, तर त्यांनी ०२२-६२४२६६६६ किंवा १८००२२०११० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: loot by private transport