गणपती व पंजांची एकत्र पूजा (व्हिडिओ)

गणपती व पंजांची एकत्र पूजा
गणपती व पंजांची एकत्र पूजा

वडगाव निंबाळकर येथील घोडके कुटुंबाचा अनोखा उपक्रम

वडगाव निंबाळकर (पुणे): गणेशोत्सव आणि मोहरम सण एकाच सप्ताहात आल्यामुळे येथील महादेव घोडके यांनी आपल्या घरात गणपती मूर्ती आणि पंजे जवळजवळ मांडून त्यांचे पूजन केले. जातीय सलोख्याच्या या वेगळ्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी गावातील हिंदू- मुस्लिम समाजांतील नागरिकांनी गर्दी केली होती.

घोडके यांच्या घरात परंपरेप्रमाणे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्याचप्रमाणे मोहरमच्या आदल्या दिवशी पंजे स्थापन करण्याची पद्धत आहे. मोहरमच्या दिवशी नमाज पठणाबरोबरच गणपतीची आरती सामुदायिक झाली. हिंदू- मुस्लिम दोन्ही समाजांतील नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. येथे मंदिर व मशीद जवळ जवळ असले, तरी जातीय सलोखा कायम आहे. अनेक पिढ्यांपासून हे चित्र कायम अबाधित असते. हिंदूंच्या प्रत्येक सण- समारंभात मुस्लिम बांधव सहभागी होत असतात.
घोडके कुटुंबीयांनी पंजे आणि गणपतीच्या मूर्तीवर श्रद्धा ठेवून पूजा केली. नमाजपठण आणि त्यानंतर केलेल्या आरतीच्या गजरातून समाजात शांतता नांदावी, हीच इच्छा असल्याचे अजिम इनामदार, शिवभान घोडके, जाकीर बागवान यांनी
सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com