पुरंदरवासीयांकडून भरभरून प्रेम - पवार 

पुरंदरवासीयांकडून भरभरून प्रेम - पवार 

पुणे - मी अनेक निवडणुका लढविल्या. मात्र, त्या दरम्यान प्रत्येक वेळेस पुरंदरवासीयांना भेटता आले नाही. तरीही त्यांच्या मतांची शक्ती माझ्या पाठीशी नेहमीच राहिली. अगदी सुप्रियालादेखील त्यांनी सहकार्यच केले. म्हणूनच त्यांना वेळ देणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे गौरवोद्‌गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.  

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान व पुरंदर मित्रमंडळ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ऐंशी वर्षे पूर्ण केल्याबद्दल सासवडचे माजी नगराध्यक्ष जयसाहेब पुरंदरे यांचा सत्कार पवार यांच्या हस्ते करण्यात आले. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, अंकुश काकडे, डॉ. सतीश देसाई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘दुष्काळ आणि पुरंदर तालुक्‍याचे नातेच आहे; पण दुष्काळ म्हणून पुरंदरवासीय कधी रडत बसले नाहीत. तर त्यावर मात करत मार्ग काढत राहिले. पुण्या-मुंबईसह देश-विदेशातही त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला. जयसाहेब पुरंदरे हे त्यापैकीच एक नाव. त्यांनीही नगराध्यक्ष झाल्यावर सासवडचा चेहरा-मोहराच बदलला. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. सासवडची औद्योगिक क्षेत्रातही प्रगती केली. अनेक हातांना रोजगाराची संधी दिली.’’

नाईक निंबाळकर म्हणाले, ‘‘सत्ता असो वा नसो. प्रश्‍न सोडविण्यासाठी शरद पवार यांची नेहमीच आठवण येते. तेही अनेकांच्या अडचणी सोडवितात. मलादेखील फलटणचे नगराध्यक्ष ते विधान परिषदेचे सभापतिपद त्यांच्यामुळेच मिळाले.

पुरंदरे म्हणाले,‘‘आमच्या वेळचे राजकारण आणि आजचे राजकारण वेगळे आहे. आमच्या वेळी आंदोलने झाली तरीही एकत्रित बसून चर्चेतून प्रश्‍न सोडवत असायचो. आता मात्र हिंसक आंदोलने चालली आहेत. हे समाजासाठी चांगले नाही.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com