मावळात राष्ट्रवादीला धक्का, तालुका अध्यक्षांचा राजीनामा

NCP
NCP

टाकवे बुद्रुक - मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश ढोरे यांच्यासह पक्ष संघटनेतील इतर सर्व आघाडीच्या अध्यक्षांनी पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे राजीनामे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाध्यक्ष प्रदीप गारवटकर यांच्या कडे सुपूर्त केले आहे. पुणे जिल्ह्यात बारामती व आंबेगाव तालुके वगळता प्रत्येक तालुक्यात गटतट आहे. त्यामुळे इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या कामाला महत्व न देता परस्पर निर्णय घेतले जात आहे. पुणे जिल्ह्यातील पक्ष संघटनेच्या नेतृत्वाच्या सासंगता व संशय व्यक्त करून पक्षाच्या जबाबदारीचे राजीनामे दिल्याची स्पष्टोक्ती मावळचे अध्यक्ष गणेश ढोर यांनी दिली. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या आशयाचे पत्र ढोरे यांनी दिले आहे, पक्षाचे युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, महिला अध्यक्षा शुभांगी राक्षे,विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी, ज्येष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष काळूराम मालपोटे, तालुकाध्यक्ष छबूराव कडू,सहकार सेलचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी पदाचे राजीनामे दिले.राजीनामा पत्रावर या सर्वाच्या स्वाक्षऱ्या असून तीन वर्षांपूर्वी संघटनेची जबाबदारी स्वीकारली ती यशस्वीपणे पार पाडली असल्याचा दावा या पद्धाधिका-यांनी केला. 

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीच्या प्रचार सभेत अजित पवार यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांक दिला होता.पक्षाविरोधी काम करणाऱ्या पक्षात थारा नाही असा इशारा दिला होता, तोच धागा पकडून या निवडणुकी नंतर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या सहा वर्षे निलंबनाची कारवाई केली, पण जिल्हा संघटनेने तालुका संघटनेला विश्वासात न घेता त्यांचे निलंबन काढून त्यांना पक्षात प्रवेश दिला.गाव पातळीवर बूथनिहाय संघटना बांधली होती, गाव, गट, विभाय निहाय संघटना बांधली आहे,या कामाचे जाहीर कार्यक्रमात अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनिल तटकरे यांनी कौतुक केले. पण आता मावळ संघटनेला डावलून परस्पर निर्णय का घेतले जातात असा प्रश्न राष्ट्रवादीच्या मावळने उपस्थितीत केला आहे. बंडखोरी मुळे दोन जागेवर अपयश आल्याने पंचायत समितीची सत्ता देखील गेली, नुकत्याच झालेल्या वडगाव नगर पंचायतीच्या निवडणूकीत पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह न वापरले नाही, या ना अशा अनेक कारणांमुळे राजीनामा दिल्याचे ढोरे यांनी सांगितले. 

मागील पंचवीस वर्षापूर्वी मावळात काँगसची सत्ता होती. मदन बाफना यांनी मावळचे प्रतिनिधित्व केले. त्यांना मंत्रीमंडळात महत्वाचे स्थान मिळाले परंतू गटबाजी त्यांचे नुकसान झाले शिवाय त्याचा लाभ कोणालाच झाला नाही. तालुका देखील विकासापासून वंचित राहीला. सध्या पुणे जिल्ह्यात आंबेगाव व बारामती वगळता सर्वच तालुक्यात गटबाजी आहे, जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जिल्हा दूध उत्पादक संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी तेथे एक हाती कारभार हाकला जातो, कार्यकर्त्यांनी डावलून परस्परविरोधी निणर्य घेतले जात आहे.ज्याच्या हाती ससा तोच पारधी अशी स्थिती पक्षात असल्याचा आरोप ढोरे यांनी केला आहे. 

एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ३५० कार्यकर्त्यांनी दिलेल्या पत्राचे अद्याप उत्तर मिळाले नाही किंवा चर्चा देखील नाही. त्यामुळे पक्षाचे काम करायचे की नाही हे कोडे आहे, यापूर्वी देखील तालुक्यातील पक्ष संघटनेवर चर्चा करावी अशी मागणी केली होती. पण चर्चा घडली नाही, याही पुढे अशी स्थिती राहीली किंवा नव्याने संघटनेचा विश्वास नियुक्त्या केल्या तर पक्ष संघटनेला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा या पत्रात देण्यात आला आहे. दस्तुरखुद्द पवारांच्या जिल्ह्यात मावळातील पद्धाधिका-यांनी दिलेल्या राजीनाम्याचे पडसाद इतर तालुक्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com