आळंदी सोहळ्यासाठी एसटीच्या जादा गाड्या 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

पुणे - कार्तिकी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर एसटीच्या पुणे विभागाने संपूर्ण जिल्ह्यातून आळंदीसाठी जागा गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे रेल्वे स्टेशन बसस्थानक, बारामती, बारामती एमआयडीसी, भोर, मंचर, जुन्नर, शिक्रापूर, नारायणगाव, शिरूर, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी- चिंचवड, देहूतून आळंदीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी केले. 

12 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सोहळा साजरा होत आहे. त्यामध्ये 14 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशीचा मुख्य दिवस असून, या दिवशी आळंदीची यात्रा भरणार आहे. 16 नोव्हेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आहे. यासाठी जाणाऱ्या भाविकासाठी बससेवा उपलब्ध केली आहे. 

पीएमपीचीही बससेवा 
आळंदीसाठी 11 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत पीएमपी 189 बस सोडणार आहे. यामध्ये मार्गावरील 65 बसव्यतिरिक्त 124 जादा बसचा समावेश आहे. स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, पालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या ठिकाणाहून आळंदीसाठी गाड्या सोडण्यात येणार आहेत. रात्री दहानंतर सोडण्यात येणाऱ्या जादा बसला नेहमीच्या तिकिटापेक्षा पाच रुपये जादा मोजावे लागणार आहेत. तर, रात्री 11 नंतर कोणत्याही प्रकारच्या पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. दरम्यान, या कालावधीत मनपा भवन ते बहूळगाव हा मार्ग संपूर्णपणे बंद राहणार आहे. तर, वाघोली ते आळंदी या मार्गावरील बस मरकळ रस्त्यावरील लक्ष्मी मंगल कार्यालय येथून संचलनात राहणार आहेत.