महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन 

पुणे - व्याख्याने, चर्चासत्रे, अभिवादन सभा आणि सामाजिक उपक्रमांमधून महात्मा जोतिराव फुले यांची जयंती शहरात मंगळवारी उत्साहात साजरी करण्यात आली. विविध संस्था-संघटनांतर्फे ठिकठिकाणी अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांसह सामाजिक उपक्रमांतून फुले यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. गंज पेठेतील महात्मा फुलेवाड्यातील त्यांच्या पुतळ्यास विविध संघटना व संस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  

फुलेवाड्यातील व महापालिकेतील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपमहापौर नवनाथ कांबळे यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले. सभागृह नेते श्रीनाथ भीमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक अजय खेडेकर, हेमंत रासने, योगेश समेळ, नगरसेविका आरती कोंढरे आणि प्रशांत वाघमारे उपस्थित होते. शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तम भूमकर यांनी फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. प्रा. तुकाराम पाटील यांचे ‘जोतिराव फुले यांचा शिक्षणाचा आटापिटा आणि शेतकऱ्यांचे त्या काळातील प्रश्‍न’ यावर व्याख्यान झाले.

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पक्षाचे माजी सरचिटणीस जितेंद्र टकले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. ॲड. औदुंबर खुने-पाटील, शंकर शिंदे, योगेश वराडे, अविनाश वेल्हाळ उपस्थित होते. शहर काँग्रेस क्रीडा सेलतर्फे अध्यक्ष सचिन सावंत यांनी पुष्पहार अर्पण केला. शहर जिल्हा महिला काँग्रेस समितीतर्फे अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कमल व्यवहारे व शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी पुष्पहार अर्पण केला. 

फुले वाड्यात शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रतिभा चाकणकर, माधवी गोसावी, सुनीता डांगे उपस्थित होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार यांचे व्याख्यान झाले. राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉ. उज्ज्वला हाके आणि सचिव बाळासाहेब कोकरे यांनी पुष्पहार अर्पण केला. दलित पॅंथरचे शहराध्यक्ष प्रकाश साळवे यांनी पुष्पहार अर्पण केला. रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भीमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. फुले यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

भारतीय रिपब्लिकन पक्षातर्फे प्रदेशाध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे आणि शहराध्यक्ष उमेश चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण केला. दांडेकर पूल ते महात्मा फुलेवाड्यापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात आली. संभाजी ब्रिगेडने आयोजिलेल्या कार्यक्रमात फुले यांना भारतरत्न मिळावा, अशी मागणी करण्यात आली. सिद्धार्थ कोंढाळकर, संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ आणि सुभाष जाधव उपस्थित होते. अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी पुष्पहार अर्पण केला. दीप्ती चवधरी, प्रशांत एकतपुरे, पुंडलिक लव्हे, दीपक गिरमे उपस्थित होते. 

झोपडपट्टी सुरक्षा दल, जय महाराष्ट्र तरुण मंडळ, मातंग एकता आंदोलन, सोपानकाका शिक्षण संस्था, जनहित फाउंडेशन, सामाजिक युवा प्रतिष्ठान, सावित्रीबाई फुले महिला मंडळ, महात्मा फुले मंडळ, विलास चौरे सामाजिक युवा प्रतिष्ठान, रिपब्लिकन संघर्ष दल व इंदिरा सार्वजनिक ग्रंथालयातर्फे महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com