आईच्या आठवणी पुस्तकरूपात

आईच्या आठवणी पुस्तकरूपात

‘माझी आई’ पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला
पुणे - विविध क्षेत्रांत आपला अमिट ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांनी सांगितलेल्या आपल्या आईच्या आठवणींचे संकलन ‘सकाळ’ प्रकाशन पुस्तकरूपाने प्रसिद्ध करत आहे. ‘मदर्स डे’च्या निमित्ताने प्रसिद्ध होत असलेल्या ‘माझी आई’ या पुस्तकात आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, व्यंग्यचित्रकार शि. द. फडणीस, कवी व समीक्षक डॉ. यशवंत मनोहर, शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे, मुस्लिम सत्यशोधक समाजाचे सय्यदभाई आदी श्रेष्ठीजनांचे लेख आहेत.
सचिन तेंडुलकर, सोनाली कुलकर्णी, डॉ. हमीद दाभोलकर, विष्णू मनोहर, महेश काळे, वीणा पाटील, सखी गोखले, आर्या आंबेकर यांच्यासह नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील आईचे स्थान व योगदान यावर लेखन केले असून, पुस्तकाला ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांची प्रस्तावना आहे.

आपल्या जडणघडणीतला आईचा वाटा, तिच्याबरोबरच त्यांचे नाते यांविषयी सर्वच मान्यवरांनी अतिशय मोकळेपणाने लिहिले आहे. काळानुरूप बदललेली आई आणि बदलत्या काळातही न बदललेले आईपण याचे दर्शन ‘माझी आई’ या पुस्तकातून वाचकांना घडेल. हे पुस्तक अतिशय संस्मरणीय व संग्राह्य भेट ठरेल. याचे प्रकाशन लवकरच होणार असून, पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी रविवारपासून (ता. १४) येत्या शनिवारपर्यंत (ता. २०) ‘सकाळ’च्या राज्यभरातील कार्यालयांत करता येईल. 

 पुस्तकाचे मूल्य रु. १५० असून, प्रकाशनपूर्व नोंदणी करणाऱ्यांना पुस्तक शंभर रुपयांत उपलब्ध होईल 
पुस्तकाविषयी किंवा प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क - ८८८८८४९०५० किंवा ०२०-२४४०५६७८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com