गोड गोड बोला!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पुणे - हेमंत ऋतू... आश्‍लेषा नक्षत्र... आणि मकर संक्रांतीचा सण.... विशेषतः महिलावर्गाचे हळदीकुंकू आणि वाण वाटण्याचा सण... कुलाचाराप्रमाणे देवादिकांना तिळवडीचा आणि गुळाच्या पोळीचा नैवेद्य... आणि सवाष्णीचे वाण देत महिलांचा वाणवसा... तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.... अशा शुभेच्छा देत राजकीय, सामाजिक तसेच नागरिकांनीही मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला. 

पुणे - हेमंत ऋतू... आश्‍लेषा नक्षत्र... आणि मकर संक्रांतीचा सण.... विशेषतः महिलावर्गाचे हळदीकुंकू आणि वाण वाटण्याचा सण... कुलाचाराप्रमाणे देवादिकांना तिळवडीचा आणि गुळाच्या पोळीचा नैवेद्य... आणि सवाष्णीचे वाण देत महिलांचा वाणवसा... तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला.... अशा शुभेच्छा देत राजकीय, सामाजिक तसेच नागरिकांनीही मकर संक्रांतीचा उत्सव साजरा केला. 

सूर्य ग्रह दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. हा सण दक्षिण भारतात ‘पोंगल’ या नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रात भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत असा तीन दिवस हा उत्सव साजरा करण्यात येतो. पुण्यातही स्थायिक दक्षिण भारतीय नागरिकांनी पोंगल साजरा केला. विशेषतः श्रीकृष्ण मंदिरात आणि अयप्पा स्वामींच्या मंदिरात सकाळपासूनच धार्मिक कार्यक्रम आयोजिले होते. देवदर्शनासाठी नागरिक सकाळपासूनच विविध मंदिरांत जमले होते. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्‌वीटरसारख्या सोशल मीडियावरूनही मकर संक्रांतीनिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत होता. गुजराथी भाषिकांनी पतंगोत्सवाचे आयोजन केले होते. 

गृहिणी तिलोत्तमा पवार म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे गूळपोळी आणि पुरणपोळी करतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ भरलेल्या सुगड्याची पूजा करून देवापुढे ठेवतो. देवळातही जाऊन तेथील देवापुढे ठेवतो. सवाष्णींना वाणवसा देतो. या निमित्ताने महिलांचे हळदीकुंकवाचे कार्यक्रमही करतो.’’

प्रथा व परंपरेप्रमाणे संक्रांतीला खणांची पूजा केली. महाराष्ट्रीय पद्धतीने सुगड्यात विविध पदार्थ भरून त्याचे पूजन करतो. लग्न झालेल्या नववधूला संक्रांतीला हुकडीचे (गव्हाच्या पिठाचे) लाडू देण्याचीही पद्धत आहे. तिळाच्या लाडवातून गुप्तदानही देण्याची पारंपरिक पद्धत आहे.
- शोभा गुजर, सदस्य, विशानेमा गुजराथी महिला मंडळ

पुणे

पुणे : 'गणेशोत्सव नक्की कोणी सुरू केला ?... तो 'ह्यांनी' सुरू केला की 'त्यांनी' सुरू केला, यापेक्षा तो सुरू झाला आणि तो...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

टाकळी हाजी (शिरूर, जि. पुणे): "ज्येष्ठ नागरिकांना मदत करण्याच्या हेतूने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे : पत्नी आई आणि वडीलांना सांभाळत नाही. घरात छोट्या मोठ्या कारणावरुन भांडत असते. याचा राग आल्यामुळे पत्नीचा तिच्या ओढणीने...

मंगळवार, 22 ऑगस्ट 2017