पुण्यात सार्वजनिक शौचालयात बलात्कार, पाठलाग करून नराधमाने साधला डाव

Rape crime
Rape crimesakal media

पुण्यात विनयभंग आणि बलात्काराच्या घटना सातत्याने वाढत असल्याचं समोर आलंय. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात १२ वर्षांच्या मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून बंडगार्डन पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Minor raped in pune)

Rape crime
पुणे हादरलं! नामांकीत शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार

पीडित मुलगी कुटुंबीयांसह साफसफाईची कामं करते. सार्वजनिक शौचालयात गेल्यानंतर आरोपीने तिचा पाठलाग केला. यानंतर तिच्यावर अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला.

पीडित मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मारवाडी नामक एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या कुटुंबीयांचा ओळखीचा आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com