मोठा भाऊ समजा, नांगरे पाटलांचे भावनिक आवाहन अन् जमाव शांत

विलास काटे
मंगळवार, 31 जुलै 2018

भविष्य काळ तुमचा चांगला
तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. चाकण औद्योगिककरणदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. काही काळ चांगले मिळणार आहे. भविष्य काळ तुमचा चांगला आहे. हे मी जबाबदारीने सांगतोय. असे सांगत त्यांनी शांततेचे आवाहन केले. यावर कार्यकर्त्यांनीही अवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान चाकणमधील जनजीवन सुरळित होण्यास सुरूवात झाली. अशा त-हेने पुन्हा एकदा नांगरे पाटिल यांनी जमावाला शांत करण्याचे कौशल्य पणाला लावण्याचे कसब दाखवून दिले.

चाकण : औद्योगिकदृष्ट्या चाकण हे पुढारलेले शहर आहे. भविष्य काळ तुमचा चांगला आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. मोठा भाऊ समजा असे भावनिक आवाहन करून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी जमावाला शांत केले. दुपारी बारा वाजल्यापासून चाकणमधले सुरू झालेले हिंसक वातावरण नांगरे पाटील यांच्या भावनिक आवाहनाने शांत होण्यास मदत झाली.

सोमवारी (ता.३०)मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनानंतर पुणे नाशिक महामार्गावर गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. संतप्त जमावाने यामध्ये पोलिसांनाही लक्ष्य केले होते. पोलिस कर्मचारी गंभिर जखमी झालेच. कुणाच्या हाता पायाला जबर दुखापत तर कुणाचे डोके फोडले होते. पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. एवढेच काय चाकण पोलिस चौकीवरही हल्ला संतप्त जमावाने केला. स्थानिक पोलिस संपूर्णपणे भेदरलेल्या अवस्थेत होते. पोलिसांनी पळ काढून सुरक्षित ठिकाणी आसरा घेत असताना दिसत होते.

चाकणमधील संपूर्ण वातावरण हिंसक घटनेमुळे ग्रामिण पोलिस दलाच्या हाताबाहेर गेले होते. मात्र दुपारी दोन नंतर स्वतः विश्वास नांगरे पाटील आणि पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी चाकण शहराला भेट दिली. रस्त्यावरून जळालेल्या अवस्थेतील गाड्या पाहून तेही अचंबित झाले. घटनेची तिव्रता लक्षात घेत जादाची पोलिस कुमक मागवली. स्वतः नांगरे पाटील रिक्षाने फिरून परिस्थितीची पाहणी करत होते. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नांगरे पाटलांनी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन केले. यामध्ये मी मोठा भाउ समजून ऐका. तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. चाकण औद्योगिककरणदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. काही काळ चांगले मिळणार आहे.

भविष्य काळ तुमचा चांगला
तुमच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे रक्त आहे. आपल्याला शांतता ठेवायची आहे. चाकण औद्योगिककरणदृष्ट्या पुढारलेले शहर आहे. काही काळ चांगले मिळणार आहे. भविष्य काळ तुमचा चांगला आहे. हे मी जबाबदारीने सांगतोय. असे सांगत त्यांनी शांततेचे आवाहन केले. यावर कार्यकर्त्यांनीही अवाहनाला प्रतिसाद दिला आणि त्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान चाकणमधील जनजीवन सुरळित होण्यास सुरूवात झाली. अशा त-हेने पुन्हा एकदा नांगरे पाटिल यांनी जमावाला शांत करण्याचे कौशल्य पणाला लावण्याचे कसब दाखवून दिले.

पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्यासाठी काल सोमवारपासून बदली झाल्यापासूनचा काम करण्याचा पहिला दिवस होता. तर खेडचे उपविभागिय अधिकारी राम पठारे यांचा अखेरचा दिवस होता. पठारे आज सेवानिवृत्त होणार होते आणि त्यातच आंदोलनाला हिंसक वळण लागले. हा निव्वळ योगायोग होता. यामुळे हिंसात्मक वळण लागलेले आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र स्वतः पठारे यांचीच गाडी जमावाने जाळली आणि त्यांच्यावरह दगडफेक केली होती. त्यामुळे ते स्वतःच भयभित होते. तर पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांनी मात्र जादा पोलिसांची कुमक मागवत बंदोबस्त नियोजन बद्द करण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: MarathaKrantiMorcha how IG Vishwas Nangre Patil control violent mob in Chakan