पूर्व कल्याणमध्ये अतिक्रमणावर धडक कारवाई

atikraman
atikraman

कल्याण : कल्याण पूर्व मधील नाना पावशे चौक ते गणपती चौक या मार्गावरील फुटपाथ आणि रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले व दुकानदारांच्या विरोधात पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून ती पुढे सातत्याने सुरू राहणार असल्याची माहिती जे/4 प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी सकाळला दिली. 

कल्याण पूर्व मधील काटेमानवली नाका ते गणपती चौक या रस्त्याचे रूंदीकरण करूनही या परीसरात फुटपाथ आणि रस्त्यावर फेरीवाले आणि दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने दररोज या परिसरात वाहतूक कोंडी होते, त्यामुळे सर्व सामान्य नागरीक त्रस्त आहेत.

फुटपाथ आणि रस्ते मोकळे करा असे आदेश पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी दिल्यानंतर मंगळवार (ता. 21) पासून जे/4 प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली पालिका अधिकारी कर्मचाऱ्यानी कल्याण पूर्व मध्ये अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाले आणि दुकानदारांविरोधात धडक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई होऊ नये म्हणून काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी दबाव आणण्यासाठी प्रयन्त केला, मात्र त्याला न जुमानता पालिकेच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने जेसीबीच्या सहाय्याने दुकाने, पत्र्यांचे शेड, फेरीवाल्यांचे सामान जमीन दोस्त केले. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण होते. या कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी तो परीसर फेरीवाला मुक्त किती काळ राहतो याकडे लक्ष लागले आहे. 

पालिका आयुक्तांच्या आदेशानंतर कल्याण पूर्व मधील जुने पोलीस स्टेशन, जनता सहकारी बँकेसमोरील अतिक्रमण, तसेच नाना पावशे चौक ते गणपती चौक दरम्यान फुटपाथ फेरीवाला मुक्त करण्यात आला असून ही कारवाई पुढील आदेश येई पर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पालिका जे / 4 प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com