बारामती वार्ड क्र.8 ठरला सृजन क्रिकेट करंडकचा मानकरी

Srujan-Cricket
Srujan-Cricket

शिर्सुफळ : शेवटच्या षटकांपर्यत रंगलेल्या अंतिम सामन्यात बारामती वार्ड क्र.8 ने मेडद संघाचा पराभव करत सृजन क्रिकेट करंडक सत्र दोनचा करंडक पटकावला. या अंतिम सामन्यावेळी शहर विरुध्द ग्रामीण असे चित्र पहायला मिळाले यामध्ये शहरी खेळाडूंनी कौशल्याने सामना जिंकला. यामध्ये प्रेक्षकांची मने मात्र मेडदच्या संघाने जिंकली. बारामतीमधील रेल्वे मैदानावर 1 डिसेंबरपासून जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्या माध्यमातून पद्मविभूषण खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सृजन क्रिकेट करंडक सत्र २ या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण शहरासह तालुक्यातील 83 संघांनी सहभाग घेतला.

यामध्ये विजेत्या बारामती वार्ड क्र.8 च्या संघास रोख पन्नास हजार रुपये व सृजन करंडक तर उपविजेत्या मेडदच संघास 35 हजार रुपये व सृजन करंडक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांच्यासह बारामती अॅग्रोचे चेअरमन राजेंद्र पवार, अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रमुख सुनंदा पवार, प्रांताधिकारी हेमंत निकम, उपसभापती शारदा खराडे, पंचायत समिती सदस्य, बारामती नगर पालिकेचे सदस्य, तहसीलदार हनुमंता पाटील इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, पद्मविभूषण शरद पवार यांनी राजकारण, समाजकारणाबरोबरच क्रिडा क्षेत्रासाठी अतुलनीय योगदान दिले. क्रिकेटबरोबरच इतर खेळांनाही प्रोत्साहन देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न राहीला आहे. ग्रामीण भागातील खेळाडूंकडे कौशल्य असतं मात्र योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळत नसल्याने अनेक क्रिडापटू मर्यादित जागेत राहतात. या सृजन स्पर्धेच्या माध्यमातून कौशल्य असलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देऊन शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेत दहा दिवसात 108 सामने अतिशय शिस्तबद्ध, खिलाडूवृत्तीने पार पडले. या स्पर्धेचा मानकरी मेडदच निलेश लोणकर, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून वासिम शेख व स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचे पारितोषिक भारत कदम यांना प्रदान करण्यात आले.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी बारामतीचे नगरसेवक विरुध्द नगरसेविकांचे पती, बारामती महसूल विरुध्द पंचायत समिती कर्मचारी व पोलिस विरुध्द वकील या प्रदर्शनीय सामन्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये नगरसेवकांचा संघ, महसुलचा संघ व पोलिसांच्या संघांनी विजय मिळविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com