शिवाजी महाराजांचे स्मारक नागरिकांसाठी खुले

शिवाजी महाराजांचे स्मारक नागरिकांसाठी खुले

भोसरी - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून भोसरीतील पीएमटी चौकात उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नागरिकांसाठी शिवजयंतीनिमित्त खुले करण्यात आले आहे.

भोसरीतील पीएमटी चौकात पिंपरी-चिंचवड पालिकेने पन्नास लाख रुपये खर्चून भव्य असे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले आहे. यामध्ये नऊ फूट उंचीचा चौथरा उभारण्यात आला आहे. चौथऱ्यावर दहा फूट उंचीची मेघडंबरी उभारण्यात आली आहे. मेघडंबरीत साडेपाच फूट उंचीची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मूर्ती आहे. स्मारकाला ऐतिहासिक किल्ल्यासारखे स्वरूप देण्यात आले आहे. हे बांधकाम नेवासा दगडात करण्यात आल्याची माहिती ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंते देवेंद्र बोरावके यांनी दिली. या स्मारकाभोवती आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आली आहे. झाडावरही विद्युत रोषणाई केली आहे. पीएमटी चौकातील या स्मारक परिसरात महापालिकेने नो हॉकर्स झोन जाहीर केला आहे. त्यामुळे हे स्मारक नागरिकांना विनाअडचणीने पाहता येणार आहे. 

लांडेवाडीतील ‘शिवसृष्टी’ला झळाळी 
भोसरीतील लांडेवाडी येथे उभारलेल्या २४ म्युरल्सची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ही शिल्पे आहेत. यामध्ये छत्रपतींच्या जन्मापासून, राज्याभिषेक कर्नाटकाच्या स्वारीपर्यंत माहिती देणारी म्युरल्स आहेत. येथील छत्रपतींच्या अश्‍वारूढ पुतळ्यालाही मेटालिक रंग देऊन झळाळी दिली आहे. रायगड दरवाजाही सजविण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी शिवसृष्टी एक आकर्षण ठरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com