'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' यशाची गुरुकिल्ली

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

भिगवण - 'ग्रामीण भागातील अनेक विदयार्थी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आहेत. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, वेळेचे व्यवस्थापन, अध्यापनासाठी आवश्यक रणनिती आदींच्या अभावांमुळे क्षमता असूनही ही मुले या परिक्षांमध्ये मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले 'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली ठरेल', असा विश्वास शिवनेरी फाऊंडेशनचे संचालक व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा.

भिगवण - 'ग्रामीण भागातील अनेक विदयार्थी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगुन आहेत. योग्य मार्गदर्शनाचा अभाव, वेळेचे व्यवस्थापन, अध्यापनासाठी आवश्यक रणनिती आदींच्या अभावांमुळे क्षमता असूनही ही मुले या परिक्षांमध्ये मागे पडत असल्याचे चित्र दिसत आहे. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा देऊन इच्छिणाऱ्या विदयार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले 'स्पर्धा परिक्षेचे डिजीटल तंत्र' ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी गुरुकिल्ली ठरेल', असा विश्वास शिवनेरी फाऊंडेशनचे संचालक व स्पर्धा परिक्षा मार्गदर्शक प्रा. सुहास कोकाटे यांनी व्यक्त केले.

सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला औषधनिर्माण महाविदयालयांमध्ये 'तयारी स्पर्धा परिक्षेची' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला औषधनिर्माण महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. उर्मिलेश झा होते. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, सकाळ जाहिरात विभाग वरिष्ठ व्यवस्थापक मकरंद पावनगडकर, भिगवण येथील कला महाविदयालयाचे प्राचार्य भास्कर गटकुळ, दत्तकला डी. फार्मसी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. विशाल बाबर, प्रा. शाम सातर्ले, जाहिरात प्रतिनिधी संजय घोरपडे उपस्थित होते. प्रा. सुहास कोकाटे पुढे म्हणाले, 'स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासांमध्ये स्वयंप्ररेणा व सातत्यपुर्ण अभ्यासाची आवश्यकता आहे. सातत्यपुर्ण अभ्यास न केल्यास अभ्यासाचा कालावधी वाढतो व नैराश्य येण्याची शक्यता असते. स्पर्धा परिक्षांच्या विद्यार्थ्यांनी निर्णय घेण्यापुर्वी शंभर वेळा विचार करावा व निर्णयानंतर शंभर टक्के प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल.' 

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. उर्मिलेश झा म्हणाले, 'विदयार्थ्यांनी आपली शक्तीस्थाने व कमजोरी याचा विचार करुन या परिक्षांमध्ये उतल्यास यश निश्चित मिळेल. ग्रामीण भागातील विदयार्थी अधिकारी झाले तर ग्रामीण भागाचे प्रश्न सुटण्यास मदत होईल. योग्य मार्गदर्शन हे स्पर्धा परिक्षांमध्ये यशस्वी होण्याचे गमक आहेत. सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशनच्या वतीने ग्रामीण विदयार्थ्यांसाठी करण्यात येत असलेले मार्गदर्शनामुळे खेड्यांमध्ये अधिकारी निर्माण होतील.'   

यावेळी निळकंठ राठोड, भास्कर गटकुळ, मकरंद पावनगडकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक दत्तात्रय कातुरे यांनी केले सुत्रसंचालन पुजा बनसोडे यांनी केले. आभार डॉ. प्रशांत चवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव माया झोळ यांचे विशेष सहकार्य लाभले. दत्तकला औषधनिर्माण महाविदयालय, भिगवण येथील कला महाविदयलायातील विदयार्थी तसेच भिगवण पोलिस ठाण्यातील खात्याअंतर्गत परिक्षा पोलिस हवालदार उपस्थित होते.

पेन ड्राईव्ह, मेमरी कार्डच्या माध्यमातून अभ्यास साहित्य - 
ग्रामीण भागातील मुलांना स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासाठी योग्य साहित्य मिळत नसल्यामुळे अभ्यास करताना मोठी अडचण येते. ही बाब विचारात घेऊन सकाळ विदया व शिवनेरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त प्रयत्नातून राज्य सेवा परिक्षा, पी. एस. आय. एस. टी. आय. ए. एस. ओ. टॅक्स असिस्टंट, खात्याअंतर्गत फौजदार, लिपीक आदी परिक्षांचे साहित्य पेन ड्राईव्ह व मेमरी कार्डच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. चालु घडामोडीसाठी व प्रश्नपत्रिका संच व्हॉसअॅप व ईमेलच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. आर्थिक किंवा इतर कारणांमुळे स्पर्धा परिक्षांपासून वंचित राहणाऱ्या विदयार्थ्यांसाठी ही मोठी संधी असल्याची भावना विदयार्थ्यांनी व्यक्त केली. 
 

Web Title: marathi news competitive exams digital study shivneri foundation