दाभोलकर, पानसरेंचे मारेकरी फरार; त्यातच लंकेश यांचा खून हे वेदनादायी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

या खुनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाशी काही संबंध आहे का, याची कसून चौकशी व्हावी,

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. पानसरे, प्रा. कलबुर्गी यांचे मारेकरी आणि त्यामागचे सूत्रधार हे अजून फरार आहेत. असे असताना त्याच पद्धतीने ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांचा खून होणे वेदनादायी आहे, असे खंत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अनिस) राज्याचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी व्यक्त केली. 

त्यांच्या खुनाला एक आठवडा उलटला तरीही लंकेश यांचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत. या मारेकऱ्यांना तातडीने पकडले जावे आणि या खुनाचा डॉ. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या खुनाशी काही संबंध आहे का, याची कसून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने केली.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
वैचारिक मतभेदांचे बळी
स्वातंत्र्याच्या सत्तरीतही या गावाला पक्का रस्ता नाहीच !
मदतीचा नव्हे... खरोखरचा हात
गणपती मांस खाताना दाखविल्याने भारताकडून तक्रार
कल्याण-डोंबिवली मनपाने श्वेतपत्रिका काढावी : मनसेची मागणी
पत्नी व मुलांच्या खून प्रकरणी आरोपीस जन्मठेप
साहित्य संमेलन धार्मिक आश्रमात नकोच : रामदास फुटाणे
बिनधास्त करा पितृपक्षात खरेदी
पाच तासांनंतर कुटुंबीयांना मृत्यूची माहिती
राज्यात तात्पुरते भारनियमन; वीजग्राहकांना सहकार्याचे आवाहन
दिल्ली : अस्खलित इंग्रजीत बोलला म्हणून तरुणास मारहाण