कात्रज घाट दुरूस्तीला मुहूर्त मिळेना!

Katraj-ghat
Katraj-ghat

खेड-शिवापूर : गेल्या एक महिन्यांपासून कात्रज घाट रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठी रस्ता बंद करण्याची परवानगी मिळत नाहीये. त्यामुळे डांबरीकरणाच्या कामाची सर्व तयारी होऊनही गेल्या महिनाभरापासून हे काम परवानगीअभावी सुरु झालेले नाही. त्यामुळे संतप्त नागरीकांनी कात्रज घाट रस्त्यावरील खड्डयांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करत "दादा तुमच्या वादयाचं काय झालं?" अशी विचारणा सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना केली आहे. सुमारे वर्षभरापासून कात्रज घाट रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे. 

भिलारेवाडी ते गुजरवाडी पर्यंतच्या रस्त्यावर वाहन चालविणे अवघड झाले असून वाहन चालक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर येथील डांबरी करणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत. 'सकाळ'नेही त्याचा वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या कामाची निविदा काढली आहे. डांबरीकरणाच्या या कामाची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र हे काम करताना कात्रज घाट रस्त्यातील एका बाजूची वाहतूक बंद करावी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी आवश्यक आहे. मात्र गेल्या एक महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला आहे. मात्र त्यांना अद्याप ही परवानगी मिळाली नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, "घाटातील डांबरीकरणाच्या कामाची सर्व तयारी झाली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रस्ता बंद करण्याची परवानगी मागितली आहे. ही परवानगी मिळण्यास अजून आठवडा लागेल. त्यानंतर डांबरीकरणाचे काम सुरु होईल. सध्या काम सुरु केल्यास वाहतुकीचा अडथळा होत आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com