बिबट्याच्या हल्ला आणखी एकाच्या जीवावर बेतला

पराग जगताप 
रविवार, 21 जानेवारी 2018

जुन्नर - हिवरे खुर्द (येधे) ता. जुन्नर येथे आज रविवारी ता. 21 ला पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. सदरची महिला ऊस तोडणी कामगार असून तिला उपचारार्थ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे वन विभागातून सांगण्यात आले. सध्या साखर कारखान्याची ऊसतोडणी सुरु असून उसात राहणारे बिबटे ऊसतोडणीमुळे शेताबाहेर पडत असून तालुक्यात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. 

यात सविता भिमराव वायसे वय. 30 रा. माळेगाव, बीड या गंभीर जखमी झाल्या आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि आज पहाटे पाच वाजे दरम्यान उसतोडणीसाठी पंधरा सोळा कामगार हिवरे खुर्द येथील जाधव मळ्यात गेले होते. उस तोडणी चालु असताना बिबट्याने सविता वायसे यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ओढून नेले. अंधार असल्याने मात्र आवाज झाल्यामुळे इतर कामगारांनी ट्र्रॅक्टरची लाईट लावून बघितले असता त्यांना बिबट्या महिलेला ओढत नेताना दिसला. त्यांनी तसाच ट्रॅक्टर बिबट्याच्या दिशेने उसात नेला. त्यामुळे बिबट्या महिलेला सोडून पळाला. गंभीर जखमी महिलेस ओझर ग्रामपंचायत सदस्य सतिश टेंभेकर व निलेश टेंभेकर यांनी सकाळी सात वाजण्याच्या आतच ओतुर प्रथमिक आरोग्य केंद्रात गाडीत आणले. तसेच येतानाच त्यांनी उद्योजक जालिदर पानसरे यांना ही घटना कळवली. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन डॉक्टर व वनविभागाला या घटनेची माहिती दिली. तसेच येथे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक धनंजय डुंबरे यांनी येऊन जखमी महिला व त्यांच्या कुटूंबाला धीर दिला. महिला गंभीर जखमी असल्यामुळे ओतुर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. श्रीहरी सारोक्ते, डॉ. यादव शेखरे, डॉ. राहुल तांबे, डॉ. योगेश तांबे, डॉ. सुशिल बागुल, पानमन सिस्टर यांनी त्यावर प्राथमिक उपचार करुन पुणे येथील शासकीय रुग्णालयात शासकीय रुग्णवाहिकेत डॉ. सचिन खेडकर यांच्या देखरेखीत पाठवले. सकाळी घटना घडल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनवर माहिती देऊनही वनविभागाकडून तातडीने कारवाईची दखल न घेतल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
  
Web Title: marathi news leopard attack on women