डाळज ते वालचंदनगर रस्त्यांच्या कामांची चौकशी करावी : पाटील

Road
Road

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यातील डाळज-जंक्शन-वालचंदनगर- कळंब रस्त्याच्या कामांमध्ये अनागोंदी कारभार सुरु असून, ठेकेदार शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरुन निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, निधी लाटण्याचा ठेेकदाराचा प्रयत्न सुरु अाहे. या रस्त्यांच्या कामाची चौकशी करुन ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य वैशाली प्रतापराव पाटील यांनी केली.

 
इंदापूर तालुक्यामध्ये केंद्रीय मार्ग निधीतून डाळज-जंक्शन- वालचंनगर-कळंब या सुमारे 25 किमी रस्त्याच्या कामासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यातील सुमारे दीड किमीचे काम राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीतून दाेन कोटी रुपये खर्च करुन गतवर्षी पूर्ण करण्यात आले आहे. २३ किमी अंतरासाठी २० कोटी रुपये खर्च करावयाचे होते. मात्र, वालचंदनगर ते कळंबोली पुलापर्यंतचे सुमारे ३ किमी अंतराचे काम निधी अभावी होणार नसल्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात येत असून, 20 किमी अंतरासाठी २० कोटी रुपये निधी खर्च करण्याचे काम सुरु आहे. 

हे काम करीत असताना ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करीत आहे. जंक्शन ते वालचंदनगर रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, रस्त्याचे काम झाल्यानंतर 3 महिन्यामध्येच सुमारे २५ ठिकाणी खचला होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दीड मीटरची साईडपट्टी करण्याऐवजी दीड फुटांची साईडपट्टी केली आहे. पूर्ण लांबीमध्ये साईड गटर खोदले नसल्यामुळे रस्ता खराब होण्यास सुरवात झाली आहे.

डाळज ते बोरी पाटीपर्यंत रस्त्यासाठी मातीमिश्रित खडी,माती व कमी डांबर वापरण्यात येत असल्यामुळे रस्त्याला आत्ताच खड्डे पडले आहेत. कळसजवळ पुलासाठी असून वाळूऐवजी दगडी कच वापरण्याचे काम सुरु असल्यामुळे पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. संपूर्ण कामाची चाैकशी करुन ठेकेदार व शासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com