'सनबर्न'ला लवळेकर ग्रामस्थांचा विरोध

SUNBURN
SUNBURN

पुणे : लवळे येथील परसेट लाईव्ह आयोजित सनबर्न फेस्टिव्हलला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवित ना हरकत प्रमाणपत्र रद्द केले. सभेनंतर लगेचच संतप्त ग्रामस्थांनी नियोजित कार्यक्रमस्थळी भेट देऊन तयारी चालू असलेली सर्व कामे बंद पाडली. आज येथील रोटमलनाथ मंदिरात पार पडलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते सनबर्नच्या विरोधात ठराव संमत करण्यात आला. बळजबरीने हा कार्यक्रम घेतल्यास आत्मदहनाचा व आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी या सभेत दिला.

यावेळी सरपंच विद्या क्षीरसागर, अॅड. अनिल शितोळे, संजय सातव, माजी उपसरपंच धोंडिबा केदारी, विजय शितोळे, भरत शिंदे, मोहन पारखी, विजय राऊत, संजय शितोळे तसेच मोठ्य संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

येथील ग्रामपंचायतीची दिशाभूल करून आयोजकांनी ना हरकत प्रमाणपत्र मिळविलेले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी ही तातडीची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती.         

येथील बावधन व लवळे गावच्या सीमेवर आॅक्सफर्ड गोल्फ रिसॅार्ट परिसरात गुरुवार दिनांक २८ ते रविवार दिनांक ३१ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीत सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले आहे. संस्कृतीचा ऱ्हास करणारा हा कार्यक्रम होऊच नये, असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला.

त्यानंतर सर्वानुमते ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सभेनंतर सरपंच व ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देऊन तयारी चालू असलेली सर्व कामे बंद पाडली. ही कामे चालू केल्यास तीव्र आंदोलन व आत्मदहनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com