गावांच्या समावेशाबाबत मुंबईत बुधवारी बैठक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

पुणे - हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत सामावून घेण्याबाबत येत्या 21 जूनला मुंबईत बैठक होणार आहे. गावांच्या समावेशासंदर्भात तीन आठवड्यांत निर्णय घेण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बैठकीत यात चर्चा होणार असून, अंतिम प्रतिज्ञापत्र तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, ग्रामीण विकास खात्याचे प्रधान सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नगरविकास विभागाचे संचालक आणि शहरातील लोकप्रतिनिधींनाही बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे.
 
हद्दीलगतची गावे सामावून घेण्यासंदर्भात हवेली तालुका नागरी कृती समितीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालावर अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याने गावे सामावून घेण्याच्या निर्णयाला आणखी मुदत देण्याची मागणी राज्य सरकारने न्यायालयाकडे केली. त्यावर तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.