सावरदरी शाळेच्या भिंती झाल्या बोलक्‍या 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

आंबेठाण : सावरदरी (ता. खेड) येथील जिल्हा परिषद शाळेला दानशूरांनी केलेली मदत आणि ब्रिजस्टोन इंडियाच्या रूपाने मिळालेला दाता यामुळे शाळेचे रूप पालटले आहे. शाळेच्या भिंती बोलक्‍या झाल्या असून, येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे ही शाळा परिसरात आदर्श बनली आहे. 

शाळेने विजेची गरज स्वतः सौरऊर्जेच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. येथील शाळेत 83 मुले, 80 मुली असे एकूण 163 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

कंपनीने शाळेसाठी संपूर्ण आरसीसी अशा चार वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत. प्रत्येक वर्गात व्हाइट बोर्ड, रेड बोर्ड आणि ग्रीन बोर्ड लावण्यात आले आहेत. पिण्याचे पाणी स्वच्छ मिळावे म्हणून दोन फिल्टर बसविण्यात आले आहेत. मुलामुलींसाठी स्वतंत्र शौचालये असून शिक्षकवृंदासाठी देखील स्वतंत्र शौचालये उभारण्यात आली आहेत.

मुलांसाठी वाचनालय असून नुकताच शाळेने एक मूल- एक झाड असा उपक्रम राबविला असून, गावच्या स्मशानभूमी परिसरात हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. याशिवाय शाळेत जमा होणारा कचरा एकत्र जमा करून त्याद्वारे कंपोस्ट खत तयार केले जात आहे.

चिमुकली मुले अगदी आनंदाने हसतखेळत शिक्षण घेत आहेत. ब्रिजस्टोन कंपनीच्या वतीने बांधण्यात आलेल्या या शाळेत रंगकाम अतिशय सुरेख केले असून, तालुक्‍याच्या विविध भागांतून नागरिक शाळा पाहण्यासाठी येत आहेत.