इंदापुरातील तलावांत पाणी सोडणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑगस्ट 2017

इंदापूर : खडकवासला धरण भरल्याने इंदापूर तालुक्‍यातील तरंगवाडी तलावात व नीरा डाव्या कालव्यातून वरकुटे खुर्द व शेटफळ हवेली तलावात पाणी सोडण्याचे आश्‍वासन अधीक्षक अभियंता संजीव चोपडे व कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येणार नसल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांनी दिली. 

पुणे पाटबंधारे विभागाचे चोपडे व शेलार यांची पुणे कार्यालयात जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, अभिजित तांबिले, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेऊन पाणीस्थितीसंदर्भात चर्चा केली. या संदर्भात तांबिले यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ''खडकवासला धरण कार्यक्षेत्रात पाऊस लांबला असल्याने पाणीटंचाईसदृश स्थिती आहे. लवकर पाऊस न पडल्यास शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीच्या पाण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल; मात्र सध्या खडकवासला धरण पावसामुळे भरले आहे. त्यामुळे तलाव आताच भरून घेतला तर शेतकऱ्यांना पाणीटंचाई जाणवणार नाही.

सध्या नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन 46 फाट्यापर्यंत सुरू आहे. तत्पूर्वी 54 फाट्याने पाणी दिले होते; मात्र 46 फाट्यावरील वरचे भरणे पूर्ण झाल्यानंतर खाली पाणी सोडण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे खडकवासला व नीरा डाव्या कालवा कार्यक्षेत्रातील तलाव भरून घेण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यातून शेतकऱ्यांना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवणार नाही.'' 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, अधीक्षक अभियंता एस. एम. लोंढे, शरद चितारे, आजिनाथ सकुंडे उपस्थित होते.